शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चंदगडला २४ गावे, १९ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: December 21, 2015 00:39 IST

उपाययोजना आराखडा सादर : पाणीटंचाई निवारण्यासाठी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित

चंदगड : मुबलक पाणी असणाऱ्या चंदगड तालुक्यात यावर्षी पावसाने दगा दिल्याने व पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे पाणीटंचाई जाणवणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ५०० मि.मी. पाऊस कमी झाल्याने चंदगड तालुक्यातील तलावामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. साठवलेले पाणीही पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी नदीत न अडवल्याने ते कर्नाटकात वाहून जात आहे. त्यामुळे नदीत पाणीसाठा न झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने २४ गावे, १९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई भासणार असल्याने उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.चंदगड तालुक्यातील झांबर, जंगमहट्टी, हेरे, आंबेवाडी व इतर प्रकल्पांत प्रमाणापेक्षा कमी पाणीसाठा झाला. त्यातच पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना बरगे न घातल्याने पाणी सरळ कर्नाटकात वाहून जात आहे. पाणी नदीत न साठवल्याने जवळपासच्या विहिरींनाही पाणी नाही. त्यामुळे विहिरीवर अवलंबून असणाऱ्या गावांना व शेतकऱ्यांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भविष्यात या गावांना तीव्र टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा विभागाने ६ सार्वजनिक विहिरी खोल करणे, ६ खासगी विहिरी अधिग्रहण करणे, प्रगतिपथावर असलेल्या ४ गावांच्या नळपाणी योजना तातडीने पूर्ण करणे, २३ गावांत नवीन विंधन विहीर खोदणे, २ गावांच्या नळपाणी योजना दुरुस्त करणे, आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.डुक्करवाडी, दाटे, तुडये, सातेरी टोक, गुडेवाडी, हाजगोळी, शिंदेवाडी, चिंचणे, नांदवडे, माडवळे, पाशिवाडा, मोटणवाडी, मौजे व मजरे जट्टेवाडी, खळणेकरवाडी, बांदराई, नगरगाव, आबेमाळ, पारगड नामखोल, वाघोत्रे, लक्कीकट्टे, कोरज या गावांना नवीन विंधन विहीर घेणे गरजेचे आहे, तर मोरेवाडी, देवरवाडी, सुंडी, कौलगे, तुडये/महादेवनगर, बागिलगे या गावांसाठी खासगी विहीर अधिग्रहण केल्यास पाणीटंचाई निवारण होईल. मळवीवाडी, कल्याणपूर, वाळकोळी, जक्कनहट्टी या ठिकाणच्या सार्वजनिक विहिरींतील गाळ काढणे, विहीर खोल कराव्या लागणार आहेत. शिवणगे, हाजगोळी / शिंदेवाडी येथील नळपाणी योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे. नागरदळे, चिंचणे येथे तात्पुरती नळपाणी योजना सुरू करण्याबाबत उपाय सुचविला आहे. सुंडी, महिपाळगड, बुक्कीहाळ, होसूर येथील नळपाणी योजना तातडीने सुरू करण्याबाबतची उपाययोजना या विभागाकडून करण्यात आली आहे.नागरिकांना पाणी टंचाईची समस्या जाणवू नये यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ३७ लाख २८ हजार रुपये अपेक्षित आहेत. आमदार संध्यादेवी कुपेकर, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे, सभापती ज्योती पाटील, शांताराम पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)ग्रामपंचायतींनी १५०० भरावेतचंदगड तालुक्यात २०० हून अधिक सुस्थित असलेले बोअरवेल आहेत. या बोअरची खासगी दुरुस्ती करून घेतल्यास ग्रामपंचायतींना भरमसाट खर्च येतो. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पंचायत समितीच्या यांत्रिकी विभागाकडे १५०० रुपये भरल्यास वर्षभर कितीही वेळा मोफत बोअरवेलची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी १५०० रुपये या विभागाकडे भरावेत, असे आवाहनही उपअभियंता ए. एस. सावळगी यांनी केले आहे.