शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईप्रश्नी अधिकारी उदासीन

By admin | Updated: April 23, 2016 01:01 IST

भुदरगड पंचायत समिती : नागरिकांतून नाराजी व्यक्त, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शिवाजी सावंत -- गारगोटी --गेले अनेक दिवस गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने ग्रामसेवक गैरहजर राहत आहेत, त्याचा नाहक त्रास तालुक्यातील जनतेला होत आहे. पाणीटंचाईने अनेक गावे तहानलेली असताना एका ठिकाणीसुद्धा भेट न देण्याचे धाडस महोदयांनी केले असून, लोकप्रतिनिधी नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तालुक्यात एकूण २४ गावे पाणीटंचाईने ग्रासली आहेत. त्यात वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून नऊ गावांतील विंधन विहिरींना पाणी लागणार नाही, असा जावई शोध लावला आहे. त्या गावातील विहिरींना पाणी आहे मग विंधन विहिरींना पाणी कसे काय लागणार नाही? असा सवाल त्या गावांतील लोकांना पडला आहे. काही ठिकाणी खासगी विहिरींमधून पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी असणारे गटविकास अधिकारी जी. आर. कांबळे यांनी मात्र एकाही ठिकाणी भेट दिलेली नाही. १४ एप्रिलला आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व शासनाचे सर्व विभागप्रमुख, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत चर्चेवेळी माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांनी प्रश्नांचा भडीमार केला होता; पण याचे समाधानकारक उत्तर देण्यास गटविकास अधिकारी कमी पडले. याबैठकीनंतर ते २0 तारखेपर्यंत कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. तालुक्यात हजर झाल्यानंतर काहीकाळ त्यानी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामसेवकांवर चांगली जरब बसविली होती; पण अलीकडे ते काही न करता केवळ काम करण्याचा दिखावा करीत आहेत, अशी कुजबुज सुरू आहे. ग्रामसेवकांचे गोपनीय अहवाल सभेत सादर केले असल्याची चर्चा सुरू आहे. गोपनीय अहवाल सभागृहात सभेपुढे सादर करण्याचे नेमके कारण काय आहे? त्याची गोपनीयता न राखण्यात नेमका कोणता ‘अर्थ ’ दडला आहे का? यासारख्या अनेक प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे. या संदर्भात तहसीलदार उज्ज्वला गाडेकर यांनी पाणीटंचाईच्या काळात कामात अक्षम्य दुर्लक्ष व कुचराई केल्याबाबत कारवाई का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांचे काम अतिशय निराशाजनक असून ते कुचकामी आहेत. पाणीटंचाई बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस ते उपस्थितीत नव्हते. यावरून त्याना सामान्य जनतेच्या अडचणीपेक्षा काय महत्त्वाचे? याबाबत लवकरच वरिष्ठांना कळविणार आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी जी. आर. कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी कामाच्या निमित्ताने बाहेर पडलो की पदाधिकारी रिकाम्या खुर्चीचे शुटिंग करतात. कारणे दाखवा नोटीस बजावली ही घटना खरी आहे; परंतु माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे अडचणी निर्माण होत आहेत. गोपनीय अहवालाच्याबाबतीत माहिती देताना त्यानी हात वर केले.