कोल्हापूर : जागतिक हवामानातील बदलांमुळे यापुढे पूर आणि दुष्काळ कमी-जास्त होत राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, अद्ययावत संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून व्यवस्थापन करून पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे मत अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील प्रा. डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.मूळचे कोल्हापूरचे असणारे प्रा. मेरवाडे हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत ‘ग्यान’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शनासाठी आले आहेत. त्यांनी पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालीचा वापर, याबाबत ‘लोकमत’समवेत संवाद साधला. ते म्हणाले, भारतातील शहरासह ग्रामीण भागातील विकासाच्या वेगाचा परिणाम पाणी उपलब्धतेवर होत आहे. हवामानातील बदलांमुळे एकीकडे पूर येईपर्यंत पाऊस पडतो; तर दुसरीकडे दुष्काळ उद्भवतो. जमिनीचा वापर आणि पर्यावरणातील बदलांमुळे जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे कठीण बनते. त्यातून पाणीटंचाई निर्माण होते. ती रोखण्यासाठी पाऊस आणि दुष्काळी स्थितीचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या देशात अमेरिका, युरोप, इंग्लंड, हॉलंड, आदी देशांप्रमाणे पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालींचा वापर करणे उपयुक्त आहे. त्यासाठी राजकीय पातळीवरून पाठबळ देण्याची गरज आहे. अचूक हवामान समजल्यास भविष्यातील धोक्यांबाबत दक्ष राहून कार्यवाही करता येणे शक्य आहे. त्यामुळे देशातील अचूक हवामानासाठी संबंधित यंत्रणेने सदोष माहितीचा वापर करणे आवश्यक आहे. लहान गावांमध्ये जलयुक्त शिवार पाणी संवर्धनासाठी ठीक आहे; पण मोठी शहरे, त्यांच्या परिसरात संगणकीय प्रणालीद्वारे जलस्रोतांचे व्यवस्थापन करून पाण्याचे अधिक संवर्धन करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, अद्ययावत संगणकीय प्रणालीद्वारे नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाऊस पडल्यास पाणी संवर्धनासाठी नेमके कोठे काय करावे, दुष्काळ पडणार असल्यास पाणी व्यवस्थापन कसे करावे याची माहिती उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर उपयुक्त ठरतो.प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते. प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते.
संगणकीय प्रणालीद्वारे पाणी व्यवस्थापन शक्य
By admin | Updated: June 8, 2016 00:08 IST