शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

इचलकरंजीस वारणेतून पाणी

By admin | Updated: April 7, 2016 23:59 IST

सुरेश हाळवणकर : दानोळी येथून ७१ कोटींच्या वारणा नळ योजनेस मान्यता

इचलकरंजी : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या ७१ कोटी रुपये खर्चाच्या नळ योजनेस शासनाने मान्यता दिली असून, हा प्रकल्प अमृत सिटी योजनेतून साकारला जाणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांतून पाण्याचा पुरवठा शाश्वत होत नसल्याने वारणा नदीतून पाणी आणणारी योजना नगरपालिकेने तातडीने मंजूर केली. केंद्र सरकारच्या अमृत योजनेमध्ये या योजनेचा समावेश होण्यासाठी अत्यंत कमी कालावधी असतानासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणा योजनेसाठी विशेष प्रयत्न केले आणि हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. दिल्ली येथे जाऊन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकया नायडू यांनाही शहरासाठी या पाणी योजनेची आवश्यकता असल्याचे समजावून सांगितले. मंत्री नायडू यांनीसुद्धा या योजनेचा प्रस्ताव तत्काळ अमृत योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले. यासाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, पाणी पुरवठा सभापती दिलीप झोळ आणि सर्वपक्षीय नगरसेवक यांचे सहकार्य मोलाचे ठरले. तसेच मुख्यमंत्र्यांबरोबर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही विशेष प्रयत्न या योजनेला लाभले.यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, पाणी पुरवठा सभापती दिलीप झोळ, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, गटनेते महादेव गौड, नगरसेवक शशांक बावचकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा वारणा नदीतून १९.५ किलोमीटर लांबीची दाबनलिका टाकण्यात येणार आहे. या नळ योजनेमध्ये इंटकवेल, जॅकवेल, वीजगृह, निरीक्षण विहीर, दोन नलिका, पंप हाऊस, ब्रेक प्रेशर टॅँक, अप्रोच ब्रिज अशा प्रकारची ७१ कोटी रुपयांची कामे समाविष्ट आहेत. साधारणपणे २०४९ मध्ये शहराची होणारी लोकसंख्या गृहीत धरून दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणारी योजना असेल, असेही आमदार हाळवणकर म्हणाले. शिरोळचे पाणी पेटणारदानोळीकरांची आज बैठक : इचलकरंजीस पाणी देण्यास तीव्र विरोध दानोळी : येथील वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, अशी ठाम भूमिका दानोळी गावाने घेतली आहे़ वारणा नदीतून अल्पसा होणारा पाणीपुरवठा, त्यात भीषण पाणीटंचाई याचे गणित लक्षात घेता भविष्यात दानोळीसह परिसरातील गावांना वारणा नदीतील पाणी महत्त्वाचे असल्याने दानोळीच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे़ यासाठी आज, शुक्रवारी सकाळी गावचावडीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे़सध्याची दुष्काळ स्थिती पाहता पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ यातच इचलकरंजी नगरपालिकेने अमृत योजनेतून दानोळी येथील वारणा नदीतून पाणी उपसा करणार असल्याचे जाहीर केले आहे़ मात्र, दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज, खोची, नरंदे, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी, आदींसह परिसरातील गावांना वारणा नदीपात्रातून पाणी उपसा केला जातो़ मागील महिन्यात वारणेतील पाणी कमी झाल्यामुळे वारणा काठावरील गावांना सात-आठ दिवस पाणी मिळाले नव्हते़ शेतीसाठी पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी भांडण्याची वेळ येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत़ इचलकरंजी शहर तीन लाखांहून अधिक लोकसंख्येचे असल्यामुळे शहराला दररोज मोठ्या प्रमाणात पाणी उपसा लागणार आहे़ यातच वारणा नदी ही कृष्णेची उपनदी असल्याने या नदीचे पात्रही छोटे आहे़ पावसाचेही प्रमाण कमी झाल्याने भविष्यात मोठी पाणीटंचाई निर्माण होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटत असून शेतीपिकांना पाणी मागण्याची वेळ येऊ नये, यासाठी दानोळीच्या नागरिकांनी यावर गांभीर्यपूर्वक विचार केला आहे़इचलकरंजीला दानोळी येथील वारणा नदीतून पाणी उपसा करण्याचा ठराव मोडीत काढण्यासाठी दानोळी गावाने बैठक आज, शुक्रवारी गावचावडीत आयोजित केली आहे़ इचलकरंजीचे पाणी रोखणारशिरोळकरांचा इशारा : पंचगंगेचे बंधारे अडविल्याने संताप कुरुंदवाड : पंचगंगा नदी कोरडी पडल्याने शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या गावातील शेतीची पिके धोक्यात आली आहेत़ तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशा परिस्थितीत धरणांतून येणारे पाणी इचलकरंजी बंधाऱ्याद्वारे अडविल्याने व नगराध्यक्षासह नगरसेवकांनी बरगे काढण्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना अटकाव केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासो चौगुले यांनी बरगे न काढल्यास कुरुंदवाडमधील इचलकरंजीची कृष्णा नळ योजना फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिरोळ व इचलकरंजीकर यांच्यात पाण्यावरून भडका उडण्याची शक्यता आहे़पंचगंगा नदीवर शिरोळ तालुक्यातील २२ गावे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत़ इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे पाणी सोडले जात असल्याने प्रदूषित पाण्यामुळे मुळातच शिरोळ तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ शहरवासीयांचा हा अन्याय सहन करीत असतानाच पाण्याअभावी नदी कोरडी पडत असल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे़ शेतीबाबत पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पाणी कपात योजना अवलंबली आहे़ मात्र, धरणातून येणारे पाणी इचलकरंजी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यात बरगे घालून अडविले आहे़ त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ किमान पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याचे बरगे काढण्यास गेले असता नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी विरोध केल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले़ धरणातून सोडण्यात येणारे पाणी अडविण्याचा पालिका पदाधिकाऱ्यांना अधिकार काय? असा सवाल अण्णासो चौगुले यांनी केला आहे़