शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अपंग, निराधार महिलेच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: February 18, 2017 23:46 IST

दारिद्र्यरेषेखालील कार्डापासून वंचित : अधिकारी मात्र निद्रिस्त; ६00 रुपयांत महिना काढताना नाकीनऊ

प्रदीप भोवड --- कणकवली --दु:ख कुणी किती सहन करावे यालाही काही मर्यादा आहेत. कुणाला त्रास द्यावा यालाही सीमा आहेत. जी महिला निराधार आहे, जिचे उत्पन्न महिना ६00 रुपये आहे, ती महिला दारिद्र्यरेषेखालील यादीत बसत नाही, असे ऐकल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे दारिद्र्यरेषेखालील यादीचे नियम तरी काय आहेत, असा प्रश्न पडतो. असलदे-नांदगाव येथील कुंदा रामचंद्र देवरुखकर या अपंग, निराधार महिला आपल्याला दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्ड मिळावे यासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करीत आहे; पण कणकवली तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधीला, समाजसेवकाला व अधिकाऱ्याला त्यांची दया आलेली नाही. दारिद्र्यरेषेखालील कार्ड नसल्यामुळे तिला अपंगांसाठी असलेला एस.टी.चा पास मिळत नाही. तिच्या घरात कमवता कोणीही नाही, तरी तिला दारिद्र्यरेषेखालील असलेले रेशनकार्ड मिळत नाही, त्यामुळे ती दारिद्र्यरेषेखालील धान्यापासून वंचित आहे. या अपंग महिलेने दारिद्र्यरेषेखालील कार्ड मिळावे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, कणकवली तहसीलदार, कोळोशीचे तलाठी, मंडळ अधिकारी नांदगाव या सर्वांकडे अर्ज विनंत्या केल्या, पण एकाही अधिकाऱ्याला या अपंग महिलेची दया आली नाही. वार्षिक ७ हजार २00 रुपये उत्पन्न असल्याचे सर्व अधिकारी मान्य करीत आहेत, पण या महिलेला दारिद्र्यरेषेखालील कार्ड द्यायला कोणीही तयार नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. समाजातील लोकांच्या संवेदना किती बोथट झाल्यात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. एक अपंग महिला न्यायासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेपा घालते, पण तिला कोणीही आधार द्यायला तयार नाही. ती आजारी असताना उपजिल्हा रुग्णालयातही तिच्यावर मोफत औषधोपचार झालेले नाहीत. तिला औषधाची गरज असतानाही तिला उपजिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी असलेली कोणतीच सुविधा या निराधार अपंग महिलेला मिळू शकत नाही. या महिलेला ६00 रुपये संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन आहे. या महागाईच्या काळात ६00 रुपयांत महिना काढणे तिला कठीण झाले आहे. ही निराधार महिला या चिंतेनेच ग्रासली आहे. आपल्याला दारिद्र्यरेषेखालील लोकांना मिळणारे धान्य मिळावे, मोफत एस. टी. सवलत मिळावी व औषधोपचार मिळावेत, अशी तिची अपेक्षा आहे. यासाठी आपल्याला दारिद्र्यरेषेखालील पिवळे कार्ड मिळावे एवढीच तिची अपेक्षा आहे. ही माफक अपेक्षा कोणीतरी पूर्ण करावी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.आधार मागायचा कुणाकडे?या अशिक्षित, निराधार, अपंग महिलेला समाजात कोणाचाच आधार राहिला नाही. लोकप्रतिनिधींना वेळ नाही, अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांचे काही देणे-घेणे नाही, मग या महिलेने आधार मागायचा कोणाकडे ? हा मोठा प्रश्न तिला भेडसावत आहे.