शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा धरणासाठी दिंडेवाडी डोंगरातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:19 IST

गारगोटी : झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरणात पाणी येण्याचे स्रोत कमी असल्यामुळे आजअखेर केवळ दोनवेळाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या धरणाकडे येणाºया पाण्याचे मार्ग वाढविण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून दिंडेवाडी गावाच्या डोंगरावरील भावेश्वरी मंदिरापासून चर काढून पाणी धरण साठ्यात सोडले.

ठळक मुद्देधरण साठ्यासाठी चर मारली : बांधल्यापासून दोनवेळाच धरण भरलेभविष्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दृष्टीने विचारपूर्वक प्रयत्न करण्याची गरज

गारगोटी : झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरणात पाणी येण्याचे स्रोत कमी असल्यामुळे आजअखेर केवळ दोनवेळाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या धरणाकडे येणाºया पाण्याचे मार्ग वाढविण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून दिंडेवाडी गावाच्या डोंगरावरील भावेश्वरी मंदिरापासून चर काढून पाणी धरण साठ्यात सोडले.चिकोत्रा धरणक्षेत्रात पावसाची कमतरता व पाणी वाहून आणण्यासाठी कमी जलवाहिन्या यामुळेच धरण बांधल्यापासून केवळ दोनवेळा हे धरण भरले होते. आजपर्यंत ४५ ते ५० टक्के धरण भरते. त्यामुळेच या धरणाखाली येणाºया भिजक्षेत्रातील पिके पाण्याविना सुकून जातात. हे धरण भरण्यासाठी म्हातारीच्या पठारावर वनबंधारा बांधून तो बंधारा भरल्यानंतर पाणी या धरणाकडे वळविण्यात आले होते. परंतु, मेघोली ग्रामस्थांच्या भात रोप लावणीसाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे या पाण्यावरून वाद निर्माण झाला.शेवटी तडजोडीअंती दोन्ही बाजूला निम्मे-निम्मे पाणीलावण्यात आले. त्यामुळे भुदरगड पंचायत समिती माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्या प्रयत्नांतून आमदार हसन मुश्रीफ यांच्या निधीतून दिंडेवाडी गावाच्या पूर्वेला डोंगरावर असलेल्या भावेश्वरी मंदिराच्या परिसरातून सुमारे अडीच कि.मी. चर मारून तेथून पाणी या धरणात सोडण्यात येणार आहे.

या कामाचा प्रारंभ विश्वनाथ कुंभार, शशिकांत खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, दिंडेवाडी (भावेश्वरी) मंदिरापासून झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरणाकडे नदीच्या पात्रात पावसाळ्यामधील वाया जाणारे पाणी अडीच कि.मी.ची चर काढून आणून सोडणे आमदार मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने शक्य झाले आहे. भविष्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दृष्टीने विचारपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.