शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कचऱ्याचा डोंगर वाढता वाढे...

By admin | Updated: January 7, 2015 00:04 IST

शहराचा प्रश्न गंभीर : कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कागदावरच

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील दररोजच्या दोनशे टन कचरा निराकरणाचा प्रश्न गंभीर बनला असून कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्तावीत असलेला ‘रोकेम’ कंपनीचा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. प्रकल्पासाठी जागेचा तिढा सुटत नसल्याने कचराप्रश्नी कोल्हापूरचीही कचरापूर म्हणून ओळख असलेल्या पुण्यासारखीच अवस्था झाली आहे. पुणे शहरातील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या ‘रोकेम’ कंपनीचा ठेका रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पुण्यात दररोज दोन हजार टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील कचरा प्रश्न गंभीर वळणार पोहोचला आहे. पुण्यानंतर ‘रोकेम’ने कोल्हापुरातील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका मिळविला. निविदा मंजूर होऊन वर्ष उलटले. कंपनीने दीड कोटी बँक गॅरंटीसह ४० लाख रुपयांची अनामत रक्कमही महापालिकेकडे जमा केली आहे. मात्र, कंपनीला आवश्यक असणारी चार एकरांपैकी एक एकर जागाही झूम प्रकल्पावर उपलब्ध होऊ न शकल्याने प्रकल्प कागदावरच राहिला आहे तसेच ‘रोकेम’ला जागेअभावी पुण्यातील सुरू असलेला प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली आहे. शहरात दररोज निर्माण होणारा २००टन कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न कोल्हापूर महापालिकेला सतावत आहे. कोंडाळ्यातच कचरा जाळणे, तीन-चार दिवसांनंतर उठाव करणे, झूम प्रकल्पातील वाळलेला कचरा जाळून जागा निर्माण करणे, आदी जुजबी उपाय मनपा प्रशासन करत आहे. शहरात झूम प्रकल्पावर साचलेला तब्बल तीन लाख टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यामुळष पुणे-नाशिकनंतर ‘सर्वांत वेगाने विस्तारणारे शहर’ असे बिरुद घेऊन वाटचाल करणाऱ्या कोल्हापूरची नवी ओळख ‘कचरापूर’ अशीच होत आहे. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेकामहापालिकेने रोकेम ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका दिला आहे. महापालिका प्रतिटन ३०८ रुपये दराने पैसे देऊन प्रकल्पापर्यंत कचरा पोहोच करणार आहे. हा दर तीस वर्षांपर्यंत स्थिर राहील यामध्ये बदल होणार नाही. प्रकल्पासाठी १ रुपया प्रति चौ. फू ट दराने महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. प्रकल्पसाठीचा किमान ३० कोटी रुपयांचा खर्च कंपनी करणार आहे.पावसाळ्यानंतर राजारामपुरी परिसरातील टाकाळा खणीत ‘लँडफिल्ड साईट डेव्हलपिंग’(कचरा टाकण्याची शास्त्रीय जागा) तयार करण्याचे थांबलेले काम आता पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. झूम प्रकल्पातील कचऱ्याची चाळण करून राहिलेल्या कचऱ्याचे घटक (इनर्ट मटेरिअल) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निकषांनुसारच या खणीत टाकले जाणार आहेत. खणीचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतरच कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प दृष्टिक्षेपात येईल.- डॉ. विजय पाटील (मुख्य आरोग्य निरीक्षक)पाच हजार टन ई-कचऱ्याचे आव्हानवर्षाला पाच हजार टनांहून अधिक ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचा यक्षप्र्रश्न महापालिकेसमोर आहे. जागोजागी भंगार जमा करणाऱ्यांकडून सोने, चांदी, तांबे, लोखंड, अ‍ॅल्युमिनिअम, आदी धातंूच्या आमिषापोटी खराब झालेले टी.व्ही., कॉम्प्युटर, वायर्स व सीडी, आदीं ई-कचऱ्याची अशास्त्रीय विल्हेवाट लावली जात असल्याचे सहज दृष्टीस पडते. त्यामुळे क्लोरिन, सल्फर डायॉक्साईड, डायोक्सिन, क्लोरिनेटेड डायोक्सिन, पॉलिक्लिनिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, बेरिलियम कॅडमियम, आदी विषारी वायू व घटकांचा पर्यावरणात भडिमार केला जातो.