शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
2
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
4
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
5
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
6
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
7
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
8
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधा मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
9
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
10
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
13
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
16
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
17
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
18
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
19
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
20
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...

प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: January 16, 2015 23:41 IST

शिरोळ मधील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका : १३ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचना पूर्ण होणार

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसह प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही प्रक्रिया १३ फेब्रूवारीपर्यंत पार पडली जाणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्तने धुमशान पेटणार आहे. तालुक्यातील नृसिंहवाडी, बस्तवाड, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, घोसरवाड, तेरवाड, बुबनाळ, मजरेवाडी, निमशिरगांव, उदगाव, तमदलगे, जैनापूर, शिरदवाड, गौरवाड, शिरटी, जुने दानवाड, कवठेगुलंद, हसूर, घालवाड, टाकळीवाडी, कुटवाड, अर्जुनवाड, चिपरी, नांदणी, यड्राव, धरणगुत्ती, कोंडिग्रे, कोथळी, दत्तवाड, जांभळी, दानोळी व शिरढोण अशा ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. गुरूवार (दि. १५) पासून या प्रक्रियेला निवडणूक विभागाने सुरूवात केली असून २० जानेवारीला प्रभाग रचनेला अंतिम मान्यता, तर २८ जानेवारीला प्रभागांमध्ये वेगवेगळे आरक्षण टाकले जाणार आहेत. २९ जानेवारीपर्यंत आरक्षणावर हरकतीची मुदत असून १३ फेब्रुवारीला अंतिम आरक्षणाची यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. निवडणुका मे की सप्टेंबर २०१५ मध्ये होणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतही संपलेली आहे. लोकसभा विधानसभेनंतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या निवडणुका असणार आहेत. स्थानिक गटा-तटावरच होणाऱ्या या निवडणुकांचा राजकीय रंग कसा असणार याबाबतही उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बॅँकांच्या निवडणुकीनंतरच या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील असेच संकेत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील राजकारणातील संदर्भ या निवडणुकीतही दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)