शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वारणेतील ‘एटीएम’ दुसऱ्यांदा फोडल

By admin | Updated: August 6, 2014 00:41 IST

रोकड सुरक्षित : एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्ने

वारणानगर : अमृतनगर (ता. पन्हाळा) येथे ‘बॅँक आॅफ इंडिया’चे एटीएम सेंटर काल, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची खळबळजनक घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा हे एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, चोरट्यांनी एटीएम मशीन उचकटून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरल्याने एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली. एटीएम मशीन व कॅश बॉक्स चोरट्यांनी तेथेच टाकून पलायन केले. चोरट्यांनी फोडलेल्या एटीएम मशीनसह सेंटरचे सुमारे तीन लाखांवर नुकसान झाले असून, या घटनेने वारणा कोडोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वारणानगर-अमृतनगर रस्त्यावर अमृतनगर फाटा येथे बॅँक आॅफ इंडियाने ई.पी.एस. मुंबई या कंपनीचे हे एटीएम सेंटर चालविण्यास दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी चोरट्यांनी हेच एटीएम सेंटर फोडून रोकड व एटीएम मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. अवघ्या सहा महिन्यानंतर पुन्हा तेच एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडले. एटीएम सेंटर फोडल्याची घटना कोडोली पोलिसांत कळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व सहकारी बबन मोहोंडुळे, अर्जुन घनवट व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.चोरट्यांनी या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून सर्वप्रथम मशीनचे सर्व वायरिंग उचकटून काढले. त्यानंतर एटीएम मशीन लोखंडी हत्याराने उचकटून रकमेसह मशीनच उचलून बाहेर आणले. मशीनचे वजन जास्त असल्याने चोरट्यांना हे मशीन उचलून नेण्यात अपयश आले. शिवाय मशीन फोडून रक्कम नेण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला. अखेर चोरट्यांनी एटीएम मशीन रस्त्यावरच टाकून पलायन केल्याचे आढळले. आज सकाळी बॅँक आॅफ इंडिया, अमृतनगर शाखेचे मॅनेजर भुवनेश्वर दास, कर्मचारी विकास चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली. ई.पी.एस.कंपनीचे चॅनेल मॅनेजर प्रशांत तवंदीकर यांनी या घटनेची फिर्याद दिली. दरम्यान, कोडोली पोलिसांना एटीएम सेंटवरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, चोरट्यांनी चारचाकी वाहनांचा वापर केला असावा, असा अंदाज असून त्यादृष्टीने तपासाची पुढील दिशा ठरवल्याचे स. पो. नि. शरद मेमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)