शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वारणाकाठचा लढा हक्कासाठीच ! इचलकरंजीकर, कृती समिती भूमिकेवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:21 IST

जयसिंगपूर : वारणेच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, अशी आक्रमक भूमिका दानोळीसह वारणा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे.

संदीप बावचे ।जयसिंगपूर : वारणेच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, अशी आक्रमक भूमिका दानोळीसह वारणा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दानोळीकरांनी तो हाणून पाडला. साडेतीन लाख लोकसंख्येच्या शहरासाठी वारणा योजना सुरू व्हावी, यासाठी आंदोलन करण्याची भूमिका इचलकरंजी पालिकेने घेतली आहे. इचलकरंजीला एक टीएमसी पाणी राखून ठेवल्यास याचा फटका शेतीला बसेल व गंभीर स्थिती निर्माण होईल, अशीच भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. एकूणच वारणाकाठचा लढा हा हक्कासाठीच असेच चित्र सध्या आहे.वारणा नदीचे उजवा कालवा आणि डावा कालवा असे दोन विभागात नियोजन आहे. नियोजनात उजवा कालवा ११७ कि. मी.चा असून त्याचे काम ३० कि.मी. झाले आहे. आणि डावा कालवा ७० कि.मी.चा आहे, पण त्याचे काम कमी झाले आहे. अमृत योजनेस आजपर्यंत वारणा काठावरील पस्तीस गावांनी, निषेध, गावबंद, उपोषणे करून विरोध दर्शविला आहे. तसेच गावसभेचे विरोधाचे ठराव दिलेले आहेत.चांदोली धरण बांधताना धरणातील पाणी साठा हा सिंचनासाठी १८.०५ टीएमसी, पिण्यासाठी ९.५५ टीएमसी उद्योगासाठी १.२७ टीएमसी, तसेच वापरात न येणारे पाणी यामध्ये बाष्पीभवन १.२८ टीएमसी आणि मृत साठा ६.८८ असा एकूण साठा ३७.४८ इतका अपेक्षित होता. मात्र, धरण ३४.३९ टीएमसीचे बांधले गेले. एकूणच धरणाची क्षमता ही गरजेपेक्षा ३.०९ टीएमसीने कमी आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. सध्या वारणा धरण लाभक्षेत्रात २८३ गावे आहेत. पैकी फक्त ८२ गावांना पाणी मिळाले आहे. तर बाकी २०१ गावांना अद्याप वारणेचे पाणी मिळालेले नाही, तर शेतीला पाणीपुरवठा करणाºया सुमारे २०० संस्थांचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे सध्या असणारा पाणी साठा कमी पडणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली इचलकरंजीकरांचा प्रोसेस व कापड उद्योगासाठी पाणी नेण्याचा प्रयत्न आहे व ( पान ४ वर)शेतकऱ्यांमध्ये भीतीकागदोपत्री जेवढे पाणी उपसणार त्यापेक्षा तिप्पट पाण्याचा उपसा सुमारे चार हजार हॉर्स पॉवरच्या पंपाद्वारे २४ तास या योजनेतून होणार असल्याने शेतीसाठी पाणीच उरणार नाही. त्यामुळे वारणाकाठाला पुन्हा १९७२ प्रमाणे दुष्काळाच्या झळा बसतील, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. शासनाने केवळ इचलकरंजी शहराचा विचार करून ही योजना मंजूर केली. पंचगंगा नदीच्या पाण्यावर शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील अनेक गावे अवलंबून आहेत. नदीतील शुद्धीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक