शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळला नगरपालिकेची प्रतीक्षा

By admin | Updated: April 13, 2017 00:21 IST

शासनाकडे जनरेट्याची गरज : खासदार, आमदार आश्वासनपूर्ती करणार का ?

संदीप बावचे --शिरोळ  --हुपरीनंतर आता शिरोळला नगरपालिका स्थापनेच्या अंतिम मंजूरीकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून नगरपरिषदेचा प्रश्न शासन दरबारी या ना त्या कारणाने प्रलंबित पडला आहे. हुपरी ग्रामस्थांच्या जनरेट्यामुळे अखेर ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. त्यामुळे शिरोळला नगरपालिकेसाठी जनरेट्याची गरज निर्माण झाली आहे. याप्रश्नी खासदार, आमदार यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होणार का? असा सवाल शहरवासीयांतून उपस्थित केला जात आहे.आघाडी शासनाच्या काळात तालुक्याच्या ठिकाणी नगरपरिषदांचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यानंतर प्रस्तावदेखील शासन दरबारी पाठविण्यात आले. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार मार्च २०१४ मध्ये शिरोळ नगरपरिषदेची उद्घोषणा प्रसिध्द झाली. यामध्ये हरकतींसह जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या बाजूने सादर केलेला अहवाल शासनास मिळाला होता. मात्र, या ना त्या कारणाने याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित पडला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नगरपरिषदेची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. यावेळी आंदोलन अंकुश सामाजिक संस्थेने ‘नगरपरिषद का गरजेची’ यासाठी जनजागृती केली. शिरोळ नगरपरिषदेप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयातील याचिका फेटाळण्यात आल्यामुळे शिरोळला जिल्हा परिषद मतदारसंघ निश्चित झाला होता. निवडणुक प्रक्रियेमुळे शासनानेच नगरपालिकेचा निर्णय घ्यावा, असे निवडणूक आयोगाने सुचित केले होते. न्यायालयाने देखील शासनाला याबाबतचा निर्णय घ्यावा, असे सूचित केल्यामुळे नगरपालिकेच्या निर्णयाचा चेंडू शासन दरबारी पुन्हा प्रलंबित पडला होता. खासदार, आमदारांचे आश्वासनशिरोळला नगरपालिका अंतिम मंजुरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार राजू शेट्टी व आमदार उल्हास पाटील दिले होते. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनादेखील दोघांनी साकडे घातले होते. नगरपालिका होण्यासाठी ग्रामपंचायतीनेही मासिक सभा व ग्रामसभेचा ठराव दिला होता. शहराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडविण्यासाठी आता लोकप्रतिनिधींना पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. नगरपरिषदेत समाविष्टसाठी ग्रामपंचायतीने ठराव दिला आहे. पालिकेसाठी आता पुन्हा एकदा एकवटण्याची गरज आहे. शासनाकडे पाठपुराव्यानंतरच पालिका स्थापनेला मूर्त स्वरूप येईल. मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करणार आहोत.- धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुशगावचा विस्तार वाढल्यामुळे नागरी सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिका गरजेची आहे. सातत्याने माझा पाठपुरावा सुरू असून पुन्हा याप्रश्नी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - दिलीप पाटील, माजी अध्यक्ष गोकुळ दूध संघ