शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवपुतळा’च्या कामासाठी राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:46 IST

शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसरातील बगीचाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यासाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या १५ दिवसांत ही मान्यता मिळेल, अशी शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे‘शिवपुतळा’च्या कामासाठी राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षाविद्युतीकरण पूर्ण; शिवाजी विद्यापीठाकडून त्रुटींची पूर्तता

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसरातील बगीचाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यासाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या १५ दिवसांत ही मान्यता मिळेल, अशी शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे.विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा सुशोभीकरणाचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. त्यात जून २०१९ मध्ये सुशोभीकरणाअंतर्गत बगीचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या घडीव दगडांमध्ये करावे. त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचनेला समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने विरोध केला.

शहरातील महाराणी ताराराणी चौक, निवृत्ती चौकातील शिवाजी अर्धपुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे काम पाहून विद्यापीठ प्रशासनाने पुढील काम करावे, अशी मागणी या समितीने केली. ती मान्य करून विद्यापीठाने काम सुरू केले. सुशोभीकरणाच्या कामासाठी एकूण ४५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील घडीव दगड लावण्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी राज्यपालांची मान्यता घेणे आवश्यक आहे.

मान्यतेसाठी विद्यापीठाने राज्यपाल कार्यालयाने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करून पत्रव्यवहार केला आहे. ही मान्यता प्राप्त होताच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून घडीव दगड लावण्याचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, या कृती समितीने संंबंधित काम दि. १ एप्रिलपासून सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

या सुशोभीकरणाअंतर्गत विद्युतीकरण, पादचारी मार्ग, आदी स्वरूपांतील काम पूर्ण झाले आहे. संरक्षक कठड्याला बाहेरून घडीव दगड लावण्याच्या कामासाठी आर्थिक खर्च करण्यासंबंधी राज्यपालांची मान्यता घेण्याबाबतचा पत्रव्यवहार झाला आहे. मान्यता प्राप्त होताच लगेच काम सुरू केले जाईल. या आठवड्यात मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे दि. १५ मार्चपासून हे काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्याला विलंब लागणार असल्याचे दिसते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे ध्येय आहे.-डॉ. विलास नांदवडेकर,कुलसचिव 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर