शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गडमुडशिंगीकरांना निर्णयाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 19, 2016 00:51 IST

विमानतळ विस्तारीकरण : प्रस्तावाच्या कार्यवाहीला शासनाने गती द्यावी

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणाबाबत ‘ना हरकत’ ठराव देण्याची तयारी दर्शविलेल्या गडमुडशिंगी ग्रामस्थांना त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगीच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीची आवश्यकता आहे. संबंधित जमीन संपादित करण्यासाठी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठराव महत्त्वाचा आहे. याबाबतचा सकारात्मक ठराव काही अटींवर देण्याची तयारी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी जूनच्या अखेरच्या आठवड्यात दर्शविली. यानंतर विमानतळ विस्तारीकरणासह विविध प्रकल्पांसाठी गडमुडशिंगी येथील संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला व अन्य मागण्यांबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येईल, असे आश्वासन पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ३० जूनला झालेल्या बैठकीत दिले.यावेळी मुडशिंगी ग्राम विभाजनात गेलेले क्षेत्र परत मिळावे, दूधगंगा डावा कालव्यासाठीचा आणि विमानतळ विस्तारीकरणासाठीच्या संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या तिन्ही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली होती.यानंतर अद्यापही या ग्रामस्थांच्या मागण्यांबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातच आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्न आणि ठरावासाठी व्यतीत झालेला कालावधी लक्षात घेता ग्रामस्थांच्या मागण्यांचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाला सादर होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव सादरीकरणाची कार्यवाही वेगाने होणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)निर्णयानंतरच ठरावाची कार्यवाहीपाटील म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्यापही प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला नाही. गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या कॅनालबाबतच्या बैठकीत प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांनी विमानतळाबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव देण्यासंदर्भातील विचारणा केली.