शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

इतिहासाची जपणूक करणारा ‘वडार’ समाज

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

पारंपरिक उद्योग, व्यवसायात नावलौकिक : स्त्रियांचीही कामे पुरुषांइतकीच कष्टाची; दगडापासून उपयुक्त वस्तू बनवू शकणारा वर्ग --लोकमतसंगे जाणून घेऊ

प्रदीप शिंदे- कोल्हापूर -वेगवेगळ्या काळांचा इतिहास वडार समाजाने केलेल्या बांधकाम वास्तूंच्या अवशेषांतूनच समजतो. त्यांचे कौशल्य किती उच्चदर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी-ठायी मिळतात. हाच वडार समाज पारंपरिक उद्योग, व्यवसायात नावलौकिक मिळवून सर्व समाजाच्या विकासास हातभार लावत आहे. स्त्रियाही पुरुषांइतकीच कष्टाची कामे करतात. त्यादृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे.वडार समाज हा तसा देशभर पसरला असला, तरी तो आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नावे मिळालेली दिसतात. महाराष्ट्रात ‘वडार’ म्हणत असले तरी कर्नाटकात त्यांनाच ‘वड्डर’ म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला ‘वड्डोल्लु’ वा ‘ओड्डर’ असे म्हटले जाते, तर तमिळनाडूत ‘ओट्टन नायकन वा ओड्डर’ म्हणून ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यांत त्यांना ‘ओड अथवा ओडिया’ म्हणून ओळखले जाते. मूळचा वड्डार समाज हा ओडिसा व आंध्र प्रांतातील. हा समाज व्यवसायानिमित्त इतरत्र विस्तारला.पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तू बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. जाते हे साध्या प्रकारचे दळण्याचे यंत्र. पाषाणकार्यात अनेक प्रकार आल्याने त्या-त्या कामात प्रावीण्य मिळविणाऱ्यांच्या ‘मण्ण’ अथवा ‘माती वडार’, ‘गाडीवडार’, पाथरवट, ‘कल्ल वडार’ या पोटजाती बनल्या. वडार समाज दगडाशी नाळ जोडलेला. आजपर्यंतचे शिल्पवैभव निर्माण केले ते या वडार समाजाच्या पाषाणकौशल्यामुळेच. समाजाने आता शिक्षणाची कास धरली. समाजातील राज्य वडार समाज अध्यक्ष जनार्दन पोवार, मजदूर संघाचे माजी अध्यक्ष मुकंद पोवार, इचलकरंजीचे नगरसेवक तानाजी पोवार, मी वडार संघटनेचे विजय चौगुले आदी मान्यवर समाजातील मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी प्रवृत्त करीत आहेत.