शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्ह्यातील २०९५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. रविवारी (दि. १५) सकाळी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन निवडणूक साहित्यासह त्यांना मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले. थेट सरपंचपदासाठी १२४७ जण, तर सदस्यपदासाठी ८६९९ उमेदवार रिंगणात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतींसाठी आज, सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्ह्यातील २०९५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. रविवारी (दि. १५) सकाळी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन निवडणूक साहित्यासह त्यांना मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले. थेट सरपंचपदासाठी १२४७ जण, तर सदस्यपदासाठी ८६९९ उमेदवार रिंगणात आहेत. उद्या, मंगळवारी सकाळी १० पासून मतमोजणी होणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी निवडणूक अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर मतदान यंत्रा (ईव्हीएम)सह निवडणूक साहित्य देऊन प्रत्येकाला आपापल्या केंद्राकडे पाठविण्यात आले.मतदानासाठी ५८३२ मतदान यंत्रे (कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट मिळून) सज्ज ठेवण्यात आली आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, खुल्या वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे १६ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात १७७ संवेदनशील केंद्रे जाहीर करण्यात आली असून, या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.२०९५ मतदान केंद्रांवर कर्मचारीअधिकारी नियुक्ततालुका मतदान कर्मचारी क्षेत्रीयकेंद्रे अधिकारीकरवीर २८२ १५५० १०गगनबावडा ४७ २५० ०३हातकणंगले ३४४ १९०० ०६शिरोळ ७८ ६२५ २०कागल १०५ ६९३ ०८राधानगरी २०२ १२७० १०आजरा १०२ ६४३ १०भुदरगड १२२ ६७६ ०८पन्हाळा १६० ८०० ०६शाहूवाडी १४७ ८१० ०६गडहिंग्लज १३४ ७५० ०७चंदगड ११९ ६५० ०६