शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मतदानोत्सव २०१९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:01 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली. या ७२ वर्षांत आतापर्यंत लोकसभेसाठी सोळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. आता सतराव्या लोकसभेसाठी मतदान ...

देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली. या ७२ वर्षांत आतापर्यंत लोकसभेसाठी सोळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. आता सतराव्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. एकूण सात टप्प्यांत ही निवडणूक होत असून, संपूर्ण देशातील ९० कोटी मतदार या मतदानाद्वारे ५४३ खासदार निवडणार आहेत. मतदारांना लोकशाहीतील ‘राजा’ म्हणूनही संबोधले जाते. हाच राजा आपले प्रतिनिधी निवडणार आहे. त्यांच्यावर देशाच्या कारभाराची जबाबदारी सोपवतील. ‘जगातील एक मोठा लोकशाही देश’ म्हणून भारताकडे पाहिले जाते. लोकसंख्येने, क्षेत्रफळाने मोठा असलेल्या भारतात आतापर्यंत काही अपवाद वगळता निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे. अर्थात याचे सगळे श्रेय भारतीय निवडणूक आयोगाला जाते. २५ जानेवारी १९५० रोजी स्थापन झालेला हा आयोग भारत सरकारच्या अखत्यारितील एक स्वायत्त घटनात्मक संस्था असून, त्याला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले गेले आहे. आयोगाकडे स्वत:चे असे कर्मचारी फार कमी असतात, परंतु देशभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एक प्रचंड मोठी व्यापक अशी निवडणूक अत्यंत पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडली जाते. म्हणावी तितकी ही साधी गोष्ट नाही. जगाने आदर्श घ्यावा, अशीच ही निवडणूक प्रक्रिया आहे हे आपणाला मान्य करावेच लागेल.अशा या निवडणूक आयोगाच्या अफाट कामगिरीला गेल्या काही वर्षांपासून दोष देण्याचे, कलंक लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाºया ‘ईव्हीएम’ला आणि ‘व्हीव्हीपॅट’ला आरोपीच्या पिंजºयात उभे केले जात आहे. जेव्हापासून या दोन यंत्रांवर संशय व्यक्त केला जात आहे, तेव्हापासून तो दूर करण्याचा आयोग प्रयत्न करीत आहे तरीही याबाबत संशय घेणाऱ्यांचे समाधान झालेले नाही. जर पृथ्वीवरून अवकाशातील बंद पडलेले यान रोबोटच्या सहायाने दुरुस्त केले जाऊ शकत असेल आणि कालबाह्य ठरलेला उपग्रह नामशेष केला जाऊ शकत असेल, तर ‘ईव्हीएम’मध्ये बदल का होऊ शकत नाही, असा सर्वसामान्य माणसांच्या मनातील प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. आजकाल तंत्रज्ञानात प्रचंड बदल झालेला आहे. जगाच्या एका कोपºयात घडलेली घटना तुम्ही दुसºया कोपºयात अगदी काही क्षणांत पाहू शकता. दुसºया क्षणाला हजारो लाखो मैलावर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधू शकता. बँक अकौंट हॅक केली जाऊ शकतात. तुमच्या घरातील टी. व्ही. पंखे, एअर कंडिशन चालू-बंद , कमी-जास्त करू शकता. त्यामुळे अशा ‘ईव्हीएम’मध्ये देखील बदल करता येऊ शकतो, असा संशय बळावत आहे म्हणूनच पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अधून-मधून पुढे येते. यंत्रावरील संशय या निवडणुकीतून दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करत असले तरी हा संशय लगेच दूर होईल असे नाही.शेषन पदावरून निवृत्त झाल्या आणि पुढच्या काळात पुन्हा एकदा आदर्श आचारसंहितेची पायमल्ली होते की काय, अशी शंका मतदारांच्या मनात येते. ती काही अंशी रास्तसुद्धा आहे. आजही जेवणावळी, पैसे, साड्या वाटण्याचे प्रकार घडतात. मतदारांना प्रलोभने, भीती दाखविण्याचे प्रकार घडतात; पण आयोगाचे कॅमेरे तेथंपर्यंत पोहोचत नाहीत. अंमलबजावणी करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी ‘धृतराष्टÑ’ची भूमिका घेतली आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला डोळ्यांनी दिसते ते या भरारी पथकांना दिसत नाही, हाच एक कळीचा मुद्दा आहे. म्हणून पुढील काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी कशी होईल, याकडे आयोगाने अधिक जागरूकपणे पाहण्याची गरज आहे. जशी ही जबाबदार आयोगाची आहे तशीच ती मतदारांची सुद्धा आहे, हे विसरून कसे चालेल?