शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये मतदारांत उत्साह

By admin | Updated: February 22, 2017 01:15 IST

मतदानाला गर्दीच गर्दी ! : पाटील, महाडिक गटांची प्रतिष्ठा पणाला

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील निवडणूक ही नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. महाडिक व पाटील या दोन नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्त्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक चुरशीची बनविली. या मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रांवर या दोन गटांचाच पगडा प्रामुख्याने जाणवत होता. त्यामुळे पाचगाव, उजळाईवाडी, उचगाव या गावांतील मतदान केंद्रांवर असणाऱ्या गर्दीमुळे मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता; पण कोठेही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ही निवडणूक गटा-तटांच्या राजकारणात अडकल्याचे दिसत होते. अतिसंवेदशील असणाऱ्या पाचगाव मतदारसंघाकडे साऱ्या जिल्ह्णाच्या नजरा लागून होत्या. पाचगावमधील पाचगाव, कळंबा तसेच रत्नाप्पा कुंभार हायस्कूल या मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांची गर्दी होती. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील उमेदवारांनी गावातीलच मतदान केंद्रांवर ठिय्या मारणे पसंत केले. त्यांचे समर्थक इतर दोन मतदान केंद्रांवर थांबून होते. त्यामुळे सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. रत्नाप्पा कुंभार हायस्कूल या केंद्रावरील मतदारांना ओळखपत्रांच्या स्लिपा वेळेत न मिळाल्याने मतदान केंद्रावर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. मतदान नेमके कोणत्या मतदान केंद्रावर याबाबतच्या संभ्रमामुळे मतदार गोंधळून गेले होते. परिणामी या मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. उजळाईवाडी येथील विद्यामंदिर मतदान केंद्रावरही मतदारांमध्ये कमालीचा उत्साह होता. येथे दिवसभर मतदारांच्या रांगा होत्या; तर कार्यकर्त्यांचे बूथ मतदान केंद्रापासून दूरवर ठेवले होते. उमेदवार समर्थकांनी आपले बूथ महामार्गाकडून शाहू नाक्याकडे वळणाऱ्या पुलाचा आधार घेऊन त्याखाली सावलीत उभारले होते. या मतदान केंद्रावरही चुरशीने मतदान झाले. या मतदान केंद्रावर आमदार सतेज पाटील यांनी सकाळी ११ वाजता समर्थकांसह येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणखी वाढला.तामगाव येथील प्राथमिक शाळेच्या केंद्रावर मतदानासाठी दिवसभर मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत होता. दिवसभर येथे किरकोळ प्रमाणात मतदानाची नोंद झाली; तर शेवटच्या तासाभरात येथे मतदान करण्यासाठी गर्दी झाली होती. गोकुळ शिरगाव येथील मतदान केंद्रावरही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.येथे दिवसभर मतदारांनी रांगा लावून शांततेत मतदान केले. तसेच सरनोबतवाडी गडमुडशिंगी व गांधीनगर येथीलकेंद्रांवरही दिवसभर मतदारांची तुरळक गर्दी होती. (प्रतिनिधी)‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये मतदारांत उत्साहमतदानाला गर्दीच गर्दी ! : पाटील, महाडिक गटांची प्रतिष्ठा पणाला कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील निवडणूक ही नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. महाडिक व पाटील या दोन नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्त्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक चुरशीची बनविली. या मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रांवर या दोन गटांचाच पगडा प्रामुख्याने जाणवत होता. त्यामुळे पाचगाव, उजळाईवाडी, उचगाव या गावांतील मतदान केंद्रांवर असणाऱ्या गर्दीमुळे मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता; पण कोठेही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ही निवडणूक गटा-तटांच्या राजकारणात अडकल्याचे दिसत होते. अतिसंवेदशील असणाऱ्या पाचगाव मतदारसंघाकडे साऱ्या जिल्ह्णाच्या नजरा लागून होत्या. पाचगावमधील पाचगाव, कळंबा तसेच रत्नाप्पा कुंभार हायस्कूल या मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांची गर्दी होती. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील उमेदवारांनी गावातीलच मतदान केंद्रांवर ठिय्या मारणे पसंत केले. त्यांचे समर्थक इतर दोन मतदान केंद्रांवर थांबून होते. त्यामुळे सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. रत्नाप्पा कुंभार हायस्कूल या केंद्रावरील मतदारांना ओळखपत्रांच्या स्लिपा वेळेत न मिळाल्याने मतदान केंद्रावर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. मतदान नेमके कोणत्या मतदान केंद्रावर याबाबतच्या संभ्रमामुळे मतदार गोंधळून गेले होते. परिणामी या मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. उजळाईवाडी येथील विद्यामंदिर मतदान केंद्रावरही मतदारांमध्ये कमालीचा उत्साह होता. येथे दिवसभर मतदारांच्या रांगा होत्या; तर कार्यकर्त्यांचे बूथ मतदान केंद्रापासून दूरवर ठेवले होते. उमेदवार समर्थकांनी आपले बूथ महामार्गाकडून शाहू नाक्याकडे वळणाऱ्या पुलाचा आधार घेऊन त्याखाली सावलीत उभारले होते. या मतदान केंद्रावरही चुरशीने मतदान झाले. या मतदान केंद्रावर आमदार सतेज पाटील यांनी सकाळी ११ वाजता समर्थकांसह येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणखी वाढला.तामगाव येथील प्राथमिक शाळेच्या केंद्रावर मतदानासाठी दिवसभर मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत होता. दिवसभर येथे किरकोळ प्रमाणात मतदानाची नोंद झाली; तर शेवटच्या तासाभरात येथे मतदान करण्यासाठी गर्दी झाली होती. गोकुळ शिरगाव येथील मतदान केंद्रावरही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.येथे दिवसभर मतदारांनी रांगा लावून शांततेत मतदान केले. तसेच सरनोबतवाडी गडमुडशिंगी व गांधीनगर येथीलकेंद्रांवरही दिवसभर मतदारांची तुरळक गर्दी होती. (प्रतिनिधी)नगरसेवक हजर : उचगाव केंद्रावर महापालिकेचा पगडाउचगाव मतदान केंद्रावर एकाच हायस्कूलमध्ये ११ मतदान केंद्रे एकत्र असल्याने येथे मतदारांत कमालीचा उत्साह दिसून आला. या केंद्रावर दिवसभर उमेदवार, समर्थक, नेत्यांची प्रचंड गर्दी होती. सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील गटबाजीचे दर्शन प्रामुख्याने या मतदान केंद्रावर दिसून आले. येथे महाडिक गटाची धुरा महापालिकेतील ताराराणी आघाडीचे नेते व ज्येष्ठ नगरसेवक सत्यजित कदम हे सांभाळत होते. पाटील गटातर्फे स्वत: ऋतुराज पाटील यांच्यासह उपमहापौर अर्जुन माने, सभागृहाचे नेते प्रवीण केसरकर, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, आदी येथे समर्थकांसह थांबून होते. दुपारी ऋतुराज पाटील आणि सत्यजित कदम हे आपल्या समर्थकांसह मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराशी समोरासमोर थांबल्याने येथे काही काळ गोंधळ निर्माण झाला. वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. काही वेळातच आमदार अमल महाडिक यांनीही या मतदान केंद्राला भेट दिली. दरम्यान, सकाळच्या वेळेत आमदार सतेज पाटील यांनीही या मतदान केंद्राला भेट दिली होती.