शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महिला आयोग अध्यक्ष निवडीची जाहिरात २४ तासांत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:27 IST

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी १५ जानेवारी २०१९ रोजी काढण्यात आलेली जाहिरात २४ तासांत रद्द करण्यात आली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर या आयोगाच्या अध्यक्ष असताना अचानक जाहिरात आल्याने आयोगात खळबळ उडाली.

ठळक मुद्देविजया रहाटकर आणि विद्यमान समितीला मुदतवाढीची शक्यता

समीर देशपांडे।कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी १५ जानेवारी २०१९ रोजी काढण्यात आलेली जाहिरात २४ तासांत रद्द करण्यात आली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर या आयोगाच्या अध्यक्ष असताना अचानक जाहिरात आल्याने आयोगात खळबळ उडाली.विजया रहाटकर अध्यक्षा असलेल्या या आयोगामध्ये नीता ठाकरे, गयाबाई कराड, विंदा कीर्तीकर, देवयानी ठाकरे (भाजपा) आणि आशा लांडगे (रिपाइं) सदस्य आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. शिवसेनेच्या कोट्यातून एका महिलेची नियुक्ती सदस्य म्हणून आयोगावर करण्यात आली होती पण त्या आयोगाकडे फिरकल्याच नाहीत.

आपल्याला अध्यक्षपद कबूल करण्यात आले होते आणि सदस्य पदावर आपली बोळवण करण्यात आली या नाराजीतून त्या फिरकल्या नाहीत, असे त्यावेळी बोलले गेले. नियमानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. आयोगाची तीन वर्षांची मुदत ९ फेबु्रवारी २०१९ रोजी संपणार आहे. नव्या अध्यक्ष आणि सदस्यांकरता अर्ज मागविण्यासाठी १५ जानेवारी रोजी दोन दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदासाठीची पात्रताही नमूद करण्यात आली होती. तसेच हे अर्ज सादर करताना त्यासमवेत कोणती कागदपत्रे आणि पूरक माहिती जोडावी, हेही होते. मात्र ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्वीची जाहिरात अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याची दुसरी जाहिरात १७ जानेवारीला देण्यात आली आहे.

त्यामुळे जुन्या जाहिरातीनुसार कुणीही अर्ज करू नयेत; त्यांची दखल घेतली जाणार नाही, असेही या नव्या जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान समितीला मुदतवाढ देणार की कसे, याबाबत अंदाज न घेता किंवा विचारणा न करता ही जाहिरात काढण्यात आल्याने ती रद्द करावी लागल्याची चर्चा आहे. सहा महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या असताना रहाटकर यांच्या यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर