शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विवेकानंद महाविद्यालयाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:07 IST

शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेला ३८ वा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात दमदारपणे कलाप्रकारांचे सादरीकरण करीत स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या संघाने वर्चस्व राखले. या संघाने आठ स्पर्धांमध्ये बाजी मारली. त्यापाठोपाठ देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स, आजरा आणि दूधसाखर महाविद्यालयाने यश मिळविले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विवेकानंद महाविद्यालयाचे वर्चस्वनिकाल जाहीर; विजेत्यांची ‘मध्यवर्ती’साठी निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेला ३८ वा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात दमदारपणे कलाप्रकारांचे सादरीकरण करीत स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या संघाने वर्चस्व राखले. या संघाने आठ स्पर्धांमध्ये बाजी मारली. त्यापाठोपाठ देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स, आजरा आणि दूधसाखर महाविद्यालयाने यश मिळविले.कलाप्रकारनिहाय विजेते (प्रथम, द्वितीय, तृतीय) : मराठी वक्तृत्व : डी. आर. माने महाविद्यालय (कागल), दूधसाखर महाविद्यालय (बिद्री), राजाराम महाविद्यालय. हिंदी वक्तृत्व : जयसिंगपूर कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय (रुकडी). इंग्रजी वक्तृत्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (पेठवडगाव), दूधसाखर महाविद्यालय, सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ. वादविवाद : न्यू कॉलेज, विवेकानंद कॉलेज, दूधसाखर महाविद्यालय. लोककला : दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अ‍ॅँड कॉमर्स कॉलेज (इचलकरंजी), सदाशिव मंडलिक महाविद्यालय (मुरगूड), शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (यड्राव).

लोकनृत्य : आजरा महाविद्यालय, श्री शिवशाहू महाविद्यालय (सरुड), विवेकानंद कॉलेज. लोक वाद्यवृंद : विवेकानंद कॉलेज, आजरा महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स. समूहगीत : सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज. नकला : यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय (वारणानगर), आजरा महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज. एकांकिका : शरद इन्स्टिट्यूट, विवेकानंद कॉलेज, दत्ताजीराव कदम कॉलेज.

लघुनाटिका : विवेकानंद कॉलेज, भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, न्यू कॉलेज. पथनाट्य : डॉ. घाळी कॉलेज (गडहिंग्लज), भोगावती महाविद्यालय (कुरुकली), कॉमर्स कॉलेज. मूकनाट्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, श्री विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय (पेठवडगाव), श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय (इचलकरंजी).

सुगम गायन : राजाराम महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, आजरा महाविद्यालय. हा निकाल जिल्हास्तरीय महोत्सवाचे संयोजन करणाऱ्या महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांनी जाहीर केला. या विजेत्यांची सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात बुधवार (दि. ३१) पासून होणाऱ्यां मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर