शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडहून येणाऱ्या पाहुण्यांचे राजशिष्टाचारानुसार होणार स्वागत : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:43 IST

पोलंडचे उपपंतप्रधान अ‍ॅँडरेज ड्युडा हे सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरच्या दौºयावर येणार आहेत. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार त्यांचे यथोचित स्वागत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी याबाबत फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतला.

ठळक मुद्देपोलंडहून येणाऱ्या पाहुण्यांचे राजशिष्टाचारानुसार होणार स्वागत :फडणवीस संभाजीराजे यांच्या मागणीनंतर निर्णय

कोल्हापूर : पोलंडचे उपपंतप्रधान अ‍ॅँडरेज ड्युडा हे सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार त्यांचे यथोचित स्वागत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी याबाबत फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतला.पोलिश राजदूतांसह संभाजीराजे, मालोजीराजे यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत फडणवीस यांनी या संदर्भात सकारात्मकता दाखवीत, कुठल्याही प्रकारची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. या संदर्भातील सूचना त्यांनी राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना दिल्या; तसेच महाराष्ट्र शासनासाठीसुद्धा ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.कोल्हापूरच्या छत्रपतींनी दुसऱ्या महायुद्धातील पोलिश निर्वासितांना आश्रय दिला होता. त्यांच्या ऋणात आजही पोलंडवासी आहेत. तत्कालीन भारतातील जामनगर आणि कोल्हापूर या दोनच संस्थानांनी या सर्वांना आश्रय दिला होता.

जामनगरमध्ये जवळपास ५०० विद्यार्थी शिक्षणासाठी गेले, तर कोल्हापूरमध्येही पाच हजार लोक कुटुंबासह राहण्यासाठी आले. त्यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने त्यांच्यासाठी वळिवडेच्या माळावर सुसज्ज वसाहत स्थापन करून शाळा, हॉस्पिटल, राहण्याची सोय करून चर्चही बांधून दिले होते.खासदार संभाजीराजेंच्या प्रयत्नांमुळे मागील काही वर्षांपासून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पोलंडच्या राजदूतांनी कोल्हापूरला काही महिन्यांपूर्वी भेट दिली होती. येत्या सप्टेंबरमध्ये पोलंडचे प्रमुख नेते आणि २० मान्यवर कोल्हापूरला येणार आहेत. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर