शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची समीक्षाच्या भावंडांना दिवाळी भेट

By admin | Updated: November 4, 2015 23:31 IST

काही रक्कम उपचारांसाठी : शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची मदत; सामाजिक उत्तरदायित्व जपले

कोल्हापूर : पालकांनी दिवाळीत फटाके उडविण्यासाठी दिलेल्या पैशातून शिवाजी मराठा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजून जखमी झालेल्या समीक्षा कांबळे हिच्या भावंडांसाठी नवे कपडे आणि बूट भेट देऊन सामाजिक उत्तरदायित्व जपले. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. दुर्गामाता दर्शनासाठी मंडळाच्या मंडपात गेलेल्या समीक्षा कांबळे या आठ वर्षांच्या चिमुरडीचा फ्रॉक समईवर पडल्याने ती २२ आॅक्टोबरला गंभीररीत्या भाजली आहे. समीक्षाची आई धुणी-भांडी करते, तर वडील टिंबर मार्केटमध्ये मोलमजुरी करतात. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिची यंदाची दिवाळी रुग्णालयातच जाणार आहे. त्यामुळे समीक्षाच्या बहिणीला, भावाला दिवाळीचा आनंद लुटता येणार नाही. त्यामुळे शिवाजी मराठा विद्यालयातील दहावीतील साखरुन्निसा खान, लक्ष्मी कामण्णा, श्रीनाथ काजवे, राहुल कांबळे, नीलेश झेंडे, अश्विनी मुक्त, यशराज कदम, मंगेश कांबळे या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधत पालकांनी दिवाळीत फटाके उडविण्यासाठी दिलेल्या पैशातून ४५00 रुपये जमा केले. त्यातून मंगळवारी दुपारी याच शाळेत शिकणारी समीक्षाची बहीण सेजल आणि भाऊ साहिल यांना कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या उपस्थितीत दीपावली भेट म्हणून नवे कपडे आणि बूट घेऊन दिले. या छोट्याशा प्रयत्नाने समीक्षाच्या भावंडांच्या चेहऱ्यावर हासू आणले आहे. कपडे घेऊनही उरलेली १६५0 रुपयांची रक्कम समीक्षाच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मिलिंद यादव यांच्याकडे दिली आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करामिलिंद यादव गेल्या चार वर्षांपासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी मोहीम चालवितात. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना फटाक्यांपासून होणारे दुष्परिणाम आणि तोटे ते समजावून सांगत आले आहेत. शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी आम्ही फटाके वाजविणार नाही, या पैशातून गरिबाला मदत देऊ, अशी प्रतिज्ञा घेतात. यंदाही दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेला पाठबळ दिले आहे. ‘चिल्लर पार्टी’ची समीक्षाला मदत मिलिंद यादव यांनीच सुरू केलेल्या ‘चिल्लर पार्टी’ या बालचित्रपटाच्या प्रदर्शनावेळी समीक्षाला मदतीचा हात देण्याचे आवाहन बालप्रेक्षकांना केले होते. त्यावेळी १५00 रुपये जमा झाले होते.