शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

पानसरे हत्येत विनय पवारही संशयित

By admin | Updated: September 9, 2016 01:11 IST

प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले : हत्येपूर्वी सागरमाळ परिसरात टेहळणी केल्याचा संशय; तावडेच्या कोठडीत आठ दिवसांची वाढ

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक असलेला सातारा जिल्ह्यातील उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील संशयित व फरार विनय बाबूराव पवार याने कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात टेहळणी केली असल्याचे, तसेच त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे. गुरुवारी पानसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला कसबा बावडा येथील न्यायसंकुलामधील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणीस्तर न्यायाधीश यू. बी. काळपागर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याच्या कोठडीची मुदत १६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित वीरेंद्र तावडे याच्यावर बुधवारी पुणे येथील न्यायालयात सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये पानसरे हत्येचे धागेदोरे सीबीआय पोलिसांना मिळाले. त्यामुळे ‘एसआयटी’ने २ सप्टेंबर २०१६ रोजी तावडेला अटक केली. पानसरे हत्याप्रकरणी तावडेचे पुरवणी दोषारोपपत्र तीन महिन्यांत तपास अधिकारी सादर करणार आहेत.पानसरे हत्येतील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याची कोल्हापुरातील पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी तावडेला काळपागर यांच्या न्यायालयात दुपारी हजर केले. सुहेल शर्मा यांनी, पानसरे हत्येचा तपास अपूर्ण आहे. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली दुचाकी व पिस्तूल जप्त केलेले नाही. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमावर व तावडेच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्जची ३१४० रुपयांची औषधे सापडली आहेत. त्यामुळे ही औषधे कोठून आली, ती कशासाठी वापरतात, याचाही तपास करायचा आहे, असे न्यायालयाला सांगितले.यानंतर पानसरे हत्या प्रकरणासाठी नेमलेले विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजी राणे यांनी युक्तिवाद केला, पोलिसांनी जेव्हा पनवेलमधील तावडेच्या घरावर व सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला, तेव्हा ‘क्लिनकड’ नावाची औषधे सापडली. ही औषधे एच व एच-वन स्वरूपाची आहेत. त्याचबरोबर पानसरे यांच्या हत्येपूर्वी तावडेचा साथीदार संशयित विनय पवार याने सागरमाळ परिसरात टेहळणी केली आहे. या हत्येतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने त्याला ओळखले आहे. पवार हा २००९ पासून भूमिगत आहे. तसेच वीरेंद्र तावडेची दुचाकी काळ्या रंगाची होती. तीही अजून सापडलेली नाही. त्याचबरोबर त्याची ट्रॅक्स आहे. ती तो याच कारणासाठी वापरत होता. या ट्रॅक्समधून तावडेसह पवार, त्याचे साथीदार फिरत होते. ही ट्रॅक्स सापडलेली नाही, असे अ‍ॅड. राणे म्हणाले.त्यावर वीरेंद्र तावडेचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पानसरे हत्या प्रकरणातील पोलिसांच्या तपासाबाबत संशय व्यक्त केला. त्यांनी न्यायालयाने या तपासाची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये असे सांगितले आहे. तरीही, ती प्रसारमाध्यमांकडे कशी जाते? तावडे हा तपासाबाबत पोलिसांना सहकार्य करीत नाही, अशा बातम्या येतात. त्याला पोलिसच जबाबदार आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी १ जून २०१६ रोजी पनवेल येथील सनातन संस्थेचा आश्रमावर छापा टाकला. त्यावेळी तेथे काही पुस्तके, औषधे, गोळ्या व हार्डडिस्क मिळून आली. त्यानंतर १० जूनला तावडेला पोलिसांनी दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केली. २० जूनपर्यंत न्यायालयाने तावडेला पोलिस कोठडी दिली. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. उलट, न्यायालयाचा अपव्यय झाला. असे असतानाही पानसरे हत्या प्रकरणात तावडे यांच्या घरावर व सनातन संस्थेच्या आश्रमावर ‘एसआयटी’ने छापा टाकला. त्या ठिकाणी पुन्हा छापा टाकण्याची गरज नव्हती. तसेच तावडेचे अटक वॉरंट हे कोल्हापूरच्या न्यायालयात घेतले हे चुकीचे आहे. त्याचबरोबर आश्रमात सापडलेली मादक स्वरूपाच्या औषधांची तपासणी रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाने केली पाहिजे. ही औषधे कशाची आहेत, हे पोलिसांना कसे माहीत? तसेच पानसरे हत्या प्रकरणात पोलिसांनी गायकवाडच्या दोषारोपपत्रामध्ये स्प्लेंडरचा वापर केल्याचे म्हटले आहे. पण आता पोलिस बॉक्सरचा वापर केल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पोलिसांचा तपासात काही तथ्य नाही, असे अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. समीर पटवर्धन, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्यासह दिलीप पवार उपस्थित होते.----------------दोषारोपपत्र दाखल नाहीपानसरे हत्येप्रकरणी आरोपी क्रमांक १ समीर विष्णू गायकवाड यास १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात १४ डिसेंबर २०१५ ला दोषारोपपत्र (आरसीसी नंबर ९१६ /२०१५ सेशन केस नं. ३/२०१६) सादर केले. न्यायालयाच्या मंजुरीने भारतीय दंड संहितेच्या कलम १७३ (८) प्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या खून खटल्यात वीरेंद्र तावडे याला एसआयटीने पानसरे खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून २ सप्टेंबर २०१६ ला अटक केली आहे. त्याच्यावर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत त्यानंतर ९० दिवस असते, परंतु तावडे याच्यावर गुरुवारीच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्याने गोंधळ उडाला. गुरुवारी तावडे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने ती वाढवून घेण्यासाठीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर कोणतेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले नसल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी स्पष्ट केले. साडविलकरकडे आलेले पवार, अकोलकरवीरेंद्र तावडेचा साथीदार विनय पवार हा २००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहे. तावडेने विनय पवार व संशयित सारंग अकोलकर या दोघांना कोल्हापुरातील साक्षीदार संजय साडविलकर यांच्याकडे दोन पिस्तुले (अग्निशस्त्र) तयार करून घेण्यासाठी पाठविले होते. पानसरे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळीबार झाला, त्या परिसरात घटनेपूर्वी काही वेळ अगोदर व घटनेच्या अगोदरच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी काही व्यक्तींना संशयितरीत्या घुटमळताना पाहिले होते. त्यामध्ये पवार होता. साक्षीदाराने हे तपासादरम्यान, त्याचे छायाचित्र पाहून सांगितले आहे. यावरून संशयित तावडे याचा गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. साक्षीदार साडविलकर यांनी यापूर्वीच त्यांच्या जबाबामध्ये तावडेच्या सांगण्यावरून दोन व्यक्ती त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर तयार करून घेण्यासाठी आल्या होत्या, असे सांगितले आहे.मडगाव बॉम्बस्फोटापासून टॅ्रक्सचा प्रवास...तावडेचा हा ट्रॅक्सचा प्रवास गोवा येथील मडगाव बॉम्बस्फोटापासून आहे. या टॅ्रक्सचा उपयोग संशयित हे टेहळणी करण्यासाठी वापरत असल्याची माहिती पोलिस तपासांत पुढे आली आहे. पानसरे हत्येनंतर ही टॅ्रक्स गायब आहे. जत येथे ही ट्रॅक्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिस तेथे गेले; पण ती सापडली नाही.पाच औषधे व सात बिले...आरोपी तावडे याच्या झडतीत सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून जप्त केलेल्या साहित्यांची यादी न्यायालयास सादर करण्यात आली. त्यानुसार तावडे याच्याकडे ३१४० रुपयांची वेगवेगळ्या पाच प्रकारची चेतासंस्थेवर प्रभाव करणारी (सीएनएस - सेंट्रल नर्व्हस सिस्टीम) शेड्युल एच व एच-१ टॅबलेटस् असलेली औषधे, रॅपको एजन्सीकडील सीएनएस प्रभाव असणाऱ्या वेगवेगळ्या औषधांची सात बिले आणि सुरुवातीची एक ते चौदा पाने फाडलेल्या एका आवक-जावक रजिस्टरचा समावेश आहे.तावडेला तपासासाठी बेळगाव, गोव्याला नेणारपानसरे हत्येत संशयावरून अटक केलेल्या व सध्या पोलिस कोठडीत असलेल्या वीरेंद्र तावडेला तपासासाठी वाशिम, यवतमाळ, बेळगाव व गोवा येथे पोलिस कोठडीच्या काळात पोलिस नेणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.पोलिसांनी मारहाण केली नाही : तावडेगुरुवारी दुपारी तावडे याला न्यायालयात आणले. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. बी. काळपागर यांनी ‘पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली का?’ असे विचारले. त्यावेळी पोलिसांनी मला मारहाण केली नसल्याचे तावडेने न्यायालयात सांगितले.