शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी २३ हजार ग्रामसेवकांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:00 IST

ग्रामसेवकांनी विविध आठ मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केल्याने राज्याचा गावगाडा ठप्प झाला आहे. गेले चार वर्षे ग्रामविकास मंत्र्यांकडून आश्वासनापलिकडे काहीच पदरात न पडल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असून, राज्यातील २३ हजार ३६८ ग्रामसेवकांंनी असहकार आंदोलन छेडले आहे.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी २३ हजार ग्रामसेवकांचे काम बंदराज्याचा गावगाडा ठप्प, सरकारकडून पदरी निराशाच

कोल्हापूर : ग्रामसेवकांनी विविध आठ मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केल्याने राज्याचा गावगाडा ठप्प झाला आहे. गेले चार वर्षे ग्रामविकास मंत्र्यांकडून आश्वासनापलिकडे काहीच पदरात न पडल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असून, राज्यातील २३ हजार ३६८ ग्रामसेवकांंनी असहकार आंदोलन छेडले आहे.शासन व नागरिक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामसेवक गावोगावी काम करतात. गावच्या विकासात स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरते. ग्रामसेवकांच्या आठ मागण्या आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या म्हणजे, ग्रामसेवक पद रद्द करून, ग्रामविकास अधिकारी पदाचा दर्जा द्यावा, प्रवास भत्ता रकमेत वाढ करावी, या दोन प्रमुख मागण्या आहेत.

आघाडी सरकारच्या काळातही याबाबत बैठक होऊन ग्रामविकास अधिकारी दर्जास मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठविले होते. युतीचे सरकार आल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला; पण आश्वासनापलिकडे पदरात काहीच पडले नाही; त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. ९ आॅगस्टपासून राज्यातील सुमारे २३ हजार ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने राज्याचा गावगाडा एकदम ठप्प झाला आहे.पूरस्थितीमुळे कोल्हापूर, सांगलीत काम सुरूआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले होते. पूरग्रस्तांना मदतीसाठी या दोन जिल्ह्यांतील ग्रामसेवकांचे काम सुरू आहे.

गेले अनेक वर्षे विविध मागण्या ग्रामसेवक शासन दरबारी मांडत आहे. पण करूया, करणार यापलिकडे काहीच पदरात न पडल्याने नाईलाजास्तव कामबंद आंदोलन करावे लागले. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत असहकार आंदोलन सुरूच राहील.- के. आर. किरूळकर,सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर