शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गव्यांनी दिला ‘ड्रोन’लाही चकवा कोल्हापूर वनखात्याचे रात्रंदिवस हुसकावण्याचे शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:45 IST

गवे शहरात घुसू नयेत यासाठी वनखात्याने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, मंगळवारी दिवसभरामध्ये शेतकऱ्यांना एक-दोनदा गवा दिसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वनखात्याच्या ड्रोन कॅमेºयालाही गव्यांनी

ठळक मुद्देमंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत धान्य गोदाम ते रमणमळ्यापर्यंत शोध घेतला असता पवार मळ्याजवळ गव्यांच्या पायांचे ताजे ठसे पाहावयास मिळाले.

कोल्हापूर : गवे शहरात घुसू नयेत यासाठी वनखात्याने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, मंगळवारी दिवसभरामध्ये शेतकऱ्यांना एक-दोनदा गवा दिसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वनखात्याच्या ड्रोन कॅमेºयालाही गव्यांनी चकवा दिला आहे.

गेले काही दिवस जयंती नाला, विन्स हॉस्पिटल, शासकीय गोदामामागील शेती, रमणमळा, पोवार मळा या परिसरात गवे वावरत आहेत. त्यामुळे या परिसरात आणि शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने अधिकारी, कर्मचाºयांची पथके तयार केली असून, दिवसरात्र गस्त घालण्याचे आणि फटाके फोडून, मिरचीचा धूर करून गव्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत धान्य गोदाम ते रमणमळ्यापर्यंत शोध घेतला असता पवार मळ्याजवळ गव्यांच्या पायांचे ताजे ठसे पाहावयास मिळाले. तसेच सकाळी ड्रोनचा वापर करून गवे कुठे दिसतात का याचीही पाहणी करण्यात आली. मात्र, गव्यांनी ड्रोनलाही चकवा दिल्याने त्यांचे दर्शन झाले नाही. पवार मळ्याजवळ एका शेतकºयाला सकाळी गवे दिसल्याचे सांगण्यात आले.

उपवनसंरक्षक हणमंतराव धुमाळ, सहायक वनसंरक्षक व्ही. जे. गोसावी, वनक्षेत्रपाल निकम, वनपाल विजय पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि ५० कर्मचारी या सर्व शोधमोहिमेमध्ये सामील आहेत. दिवसा आणि रात्री वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली असून, त्यांच्याद्वारे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.दोनच गवे की कळप याबाबत संभ्रमावस्थाया संपूर्ण शेतवडीमध्ये दोनच गवे फिरत आहेत की त्यांचा कळप आहे याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे हे गवे कोणत्याही परिस्थितीत शहरात येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग