शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

टिक्केवाडी ग्रामस्थ पंधरा दिवसांनी गावात परतले : गुळ्ळं काढण्याची प्रथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:29 IST

गारगोटी : टिक्केवाडी (ता. भुदरगड) हे ग्रामस्थ गुळ्ळं काढून मंगळवारी सकाळी परतले. मंगळवारी ग्रामदैवत भुजाईने कौल दिल्याने गुळ्ळं काढून संपल्याने सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी परतले. पंधरा दिवसांच्या वेगळ्या धार्मिक अनुभूतीतून तनामनात आनंद भरून

ठळक मुद्देदर तीन वर्षांनी संपूर्ण गावकरी घरदार सताड उघडे सोडून गावाबाहेर जंगलात राहतात

गारगोटी : टिक्केवाडी (ता. भुदरगड) हे ग्रामस्थ गुळ्ळं काढून मंगळवारी सकाळी परतले. मंगळवारी ग्रामदैवत भुजाईने कौल दिल्याने गुळ्ळं काढून संपल्याने सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी परतले. पंधरा दिवसांच्या वेगळ्या धार्मिक अनुभूतीतून तनामनात आनंद भरून भाविक परतले आहेत. वीस फेब्रुवारी रोजी सर्व ग्रामस्थ गुळ्ळं काढण्यासाठी जंगलात गेले होते. ते मंगळवारी तब्बल पंधरा दिवसांनी परतले.

भुदरगड तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचं टिक्केवाडी गाव आहे. या गावातील ग्रामस्थ दर तीन वर्षांनी गुळ्ळं काढण्याच्या प्रथेप्रमाणे घर-दार सताड उघडे सोडून गावाबाहेर जंगलात राहण्यासाठी जातात. या कालावधीत गावात एकही माणूस नसतो की, गोठ्यात एकही जनावर नसते. कोणत्याच घरात चूल पेटलेली नाही की, दिवा पेटलेला नाही, ही आहे टिक्केवाडी गावची प्रथा. हा संपूर्ण गावच ग्रामदैवत भुजाईदेवीच्या श्रद्धेपोटी जंगलात राहायला जातो. गावकºयांच्या भाषेत 'गुळ्ळं काढायला' अनेक वर्षे गुळ्ळं काढण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून जोपासली जात आहे. सुशिक्षितांचं गाव अशी वेगळी ख्याती असलेल्या या गावानं धार्मिक प्रथा तितक्याच श्रद्धेने जोपासलेली आहे. पण पिढ्यान्पिढ्या या गावात 'गुळ्ळं काढणं' ही प्रथा चालत आली आहे. दर तीन वर्षांनी देवीच्या श्रद्धेपोटी ही प्रथा चालत आली आहे.

गुळ्ळं काढण्यापूर्वी ग्रामदैवत भुजाईला कौल लावला जातो. गाव सोडून गावच्या वेशीबाहेर राहायला जावे लागते. देवीने परवानगी दिल्यानंतर सर्व गाव घरात प्रवेश करतो. संसार व घरदार सोडून ग्रामस्थ वेशीबाहेर राहतात. शिवारात पालं, मांडव उभारून संसार थाटतात. निसर्गाच्या सान्निध्यात लहानथोर जीवन व्यतीत करतात. निसर्गात ते वनभोजनाचा आनंद घेतात. काहीजण स्वतंत्र तर काहीजण २० ते २५ कुटुंबे एकत्र येऊन एकच मांडव उभारून राहतात. गावातील स्त्रिया ग्रामीण गीतांमध्ये रंगून जातात. गौरी गीते, जात्यावरच्या ओव्या, रुखवत, उखाणे या ग्रामीण कार्यक्रमांचा रंग भरतो, तर पुरुष मंडळी भजनात रंगून जातात, तर तरुण बुद्धिबळ, कॅरम, मराठी, हिंदी गाण्यांच्या मैफलीत रंगतात. तालुक्यात सुशिक्षितांचा गाव अशी ओळख असताना गावाने प्रथेचा श्रद्धेने स्वीकार केला आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या प्रथेतून त्यांचे भुजाईदेवीवरील प्रेम या निमित्ताने पहावयास मिळते.टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थ गुळ्ळं काढून मंगळवारी सकाळी गावात पंधरा दिवसानंतर परतले.