शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गावच्या कारभाऱ्यांना अभ्यास सहलीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:16 IST

भारत पाटील ग्रामीण विकासाचा भविष्यकालीन वेध घेण्यासाठी व गावागावांनुसार ‘परिपूर्ण व शाश्वत विकास करण्यासाठी’ जिल्हा परिषद, पंचायत समिती व ...

भारत पाटीलग्रामीण विकासाचा भविष्यकालीन वेध घेण्यासाठी व गावागावांनुसार ‘परिपूर्ण व शाश्वत विकास करण्यासाठी’ जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांमधील कार्यरत असणाºया लोकप्रतिनिधींची क्षमता बांधणी आवश्यक आहे. यासाठी प्रभावी प्रशिक्षणाबरोबरच अभ्यास सहली आयोजित करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींना आपले अधिकार, कर्तव्य व जबाबदारीची जाणीव होणे अपेक्षित आहे. विविध राज्यांमधील अनेक ठिकाणी मार्गदर्शक काम झाले आहे. यामध्ये काही जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यांनी पारदर्शक व आदर्श काम केले आहे. काही सरपंचांनी आपले कर्तव्य उत्तम पद्धतीने निभावले आहे. त्यांनी आपली गावे शाश्वत विकासाची जिवंत उदाहरणे देशासमोर उभी केली आहेत. यामध्ये साताºयातील कोरेगाव, अहमदनगरमधील हिवरे बाजार व राळेगणसिद्धी, चंद्रपूरमधील राजगड, नांदेडमधील शेळगाव, अशा अनेक मार्गदर्शक गावांची नावे घेता येतील.लोकहिताची कामे ज्या गाव व परिसरात यशस्वी झाली आहेत, अशी गावे माझ्या तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांना, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना दाखविली पाहिजेत, असे मला वाटत होते. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार गाव कसं घडवलं असेल? लोकसहभाग कसा मिळविला असेल? असे प्रश्न मला पडत. या गावांची यशोगाथा समजून घ्यायची तर गावच्या कारभाऱ्यांना अभ्यास सहलीचे आयोजन केले पाहिजे, अशी माझी भावना तयार झाली होती. २००३-०४च्या पंचायत समिती अंदाजपत्रकात सहलीसाठी निधीची तरतूद केली होती. मला अभिमान वाटतो, कारण देशातील पन्हाळा पंचायत समिती एकमेव असा विचार करणारी होती. कारण बाहेरच्या परिसरामध्ये जिथे-तिथे आदर्श व ग्रामविकासातील रोल मॉडेल कामं झाली आहेत, ती गावे आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना दाखविण्यासाठी सहलीचे नियोजन करणे गरजेचे होते.पहिल्या अभ्यास दौºयाविषयी सर्व अधिकारी व पदाधिकाºयांशी संवाद करत असताना सर्वांच्या मतानुसार आम्ही यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी व पोपटराव पवारांचे हिवरेबाजार या सहलीचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामीण विकासाला दिशा देण्याचं काम यशदासारखी संस्था करते, हे माझ्यासह तालुक्यातील सरपंचांना प्रथमच समजले होते. ‘यशदा’चा सुशोभित कॅम्पस बघून आम्ही भारावलो होतो. त्यावेळीच मी मनात एक निश्चय केला होता की, एक दिवस पन्हाळ्यातील सर्व सरपंचांसाठी निवासी प्रशिक्षण आयोजित करणाार. राळेगणसिद्धीच्या भेटीत अण्णा हजारेंचा जीवनप्रवास समजून घेता आला. गावांचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो. ग्रामसभा सक्षम झाल्या तरच गावं सक्षम होतील. तरुणांना व महिलांना विकास प्रवाहात आणताना आपली गावे व्यसनमुक्त झाली पाहिजेत, ही अण्णांची शिकवण माझ्या तालुक्यातील सर्व सरपंचांना मिळाली होती.पोपटराव पवारांना माझ्या तालुक्यातील सरपंच व प्रतिनिधी आपल्याकडे घेऊन येत आहेत, याची पूर्वकल्पना अगोदरच दिली होती. यामुळे ते आमची वाट पाहत थांबले होते. सततचा दुष्काळ, अल्प पावसाचे प्रमाण अशा भौगोलिक स्थितीमध्ये असलेलं त्यांचं हिवरेबाजार. गावकºयांना बरोबर घेऊन एक सरपंच काय करू शकतो? याचं उत्तम, प्रेरणादायी व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पोपटराव पवार! जलसंधारण व पाणलोट विकासातून गावाची समृद्धी हे सूत्र हिवरेबाजारने अंगीकारले आहे.लोकसहभाग व शासन योजना यांचा मेळ घालून माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणलोट विकासाचे काम हिवरेबाजार ग्रामस्थांनी साकारले आहे. सीसीटीव्ही, बंधारे, चरखुदाई, बांधबंदिस्ती, वृक्षारोपण यांतून गावांचा चेहरामोहरा बदलविला आहे. चराई बंदी, कुराड बंदी व नशाबंदी या त्रिसूत्री कार्यक्रमामुळे गावाने देशामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ही सगळी कामे पवार यांनी आम्हाला दाखविली होती. यानंतर ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांना कृतिशील मार्गदर्शन केले होते. यामुळे आमच्या सरपंचांमधला त्यांनी माणूस जागा केला होता. एक सभापती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या विकासासाठी व सरपंचांच्या क्षमता बांधणीसाठी असा सकारात्मक विचार करू शकतो हे देशातील एकमेव उदाहरण आहे, असे कौतुकास्पद उद्गार अण्णा हजारे व पोपटराव पवार यांनी माझ्याबद्दल काढले होते.लोकप्रतिनिधी आपल्या गावाचा कायापालट करू शकतो, हा यशस्वी मंत्र आम्हाला मिळाला होता. या यशोगाथा बघितल्यामुळे मन, आचार व विचार यांना ऊर्जा मिळाली होती. आम्ही परत येताना पूर्वीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश गव्हाणे हे त्यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. त्यांनी कोरेगाव-भीमा ग्रामपंचायतीला भेटीचे नियोजन केले होते. त्यानंतर आम्हा सर्वांच्या भोजनाची व्यवस्था शिरुर पंचायत समितीने केली होती. पन्हाळ्याचे सर्व सभापती व सरपंच आपल्याकडे आले आहेत, या आनंदाने गव्हाणे भारावले होते. आमच्या पहिल्याच अभ्यास सहलीमधून भविष्यातील पन्हाळा तालुक्याच्या विकासाची उत्तुंग भरारी मिळाली होती.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीचे बिनीचे कार्यकर्ते आहेत.)