याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावचावडीचे दिवसभर कामकाज करून कर्मचारी सायंकाळी कार्यालयाला कुलूप लावून गेले होते. रात्री साडेसातच्या सुमारास कार्यालयातून धुराचे लोट येताना आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. या वेळी कार्यालय कारकून रुबाब नदाफ याने कार्यालयाचे कुलूप काढून नागरिकांच्या मदतीने पाणी मारून आग विझविली. टेबल फॅनचे स्वीच बंद न केल्याने शाॅर्टसर्किट होऊन आग लागल्याचे समजते. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळाली असून रात्री उशिरापर्यंत कोतवाल वर्षा सुतार, सहाय्यक नदाफ यांनी कागदपत्रे बाजूला करण्याचे काम करत होते.
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथील गावचावडीत लागलेल्या आगीत कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत.