शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कागलची अर्थवाहिनी ‘विक्रमसिंह घाटगे बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:41 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार कायम होता. अशा काही मोजक्या संस्थानात ‘करवीर’, ‘कागल’चा समावेश होता.कागलच्या घाटगे घराण्यातील ‘यशवंतराव’ कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीला दत्तक गेले आणि पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून जगभर ख्यातीप्राप्त झाले. त्यांनी आपल्या राज्यात जगभरात जनहिताचे जे जे काही नव्याने समोर आले, ते ते आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी हे नवीन बदल व उपक्रम कागल जहागिरीतही अमलात आणले. त्यापैकीच एक म्हणजे ‘सहकार चळवळ’ होय. २१ जुलै १९१७ रोजी कागलमध्ये स्थापन झालेली सहकार तत्त्वावरील पतपेढी म्हणजेच आजची राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक होय.कागलचे तत्कालीन अधिपती असलेल्या श्रीमंत बापूसाहेब महाराज यांना ‘पुत्ररत्न’ झाले. या दिवशी म्हणजे ८ जुलै १९१७ रोजी ही ‘पतपेढी’ स्थापण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि २१ जुलैला तशी रीतसर नोंदणी झाली. १९१२ च्या मुंबई इलाखा सहकार कायद्यान्वये ही पतपेढी नोंदवली गेली. एकशे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘अनलिमिटेड’ पतपेढीचे १९३६ मध्ये ‘लिमिटेड’मध्ये, तर १९४३ मध्ये ‘दि कागल सेंट्रल क ो-आॅप. बँक लि.’ असे रूपांतर झाले. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यानंतर कागलचे संस्थानही भारतीय संघराज्यात विलीन झाले. सहकार खात्यांतर्गत ही बँक आली; पण घाटगे घराण्याचे मार्गदर्शन आणि प्रेम या बँकेस कायम मिळत राहिले. बापूसाहेब महाराजांच्या निधनानंतर कागलचा कारभार श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराज पाहत होते. स्वातंत्र्यानंतर १९७० च्या दशकात बाळ महाराजांचे चिरंजीव स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी बँकेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी बँकेला विश्वासार्हतेबरोबरच आर्थिक वैभव प्राप्त करून दिले. त्यांचे या बँकेवर खूप प्रेम होते. विक्रमसिंह यांच्या निधनानंतर समरजित घाटगे यांनी बँकेची धुरा हाती घेतली. ते स्वत:च सी.ए. असल्याने आज ही बँक चौफेर प्रगतिपथावर आहे. सभासदांच्या मागणीवरून या बँकेचे दोन वर्षांपूर्वी ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक’ असे नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी ३० वर्षे स्थापन झालेल्या या बँकेचा हा वैभवशाली प्रवास समस्त कागलवासीयांना अभिमानास्पद असाच आहे. २४ विविध पारितोषिकांची मानकरी असलेल्या बँकेने आधुनिक बँकिंग प्रणाली आत्मसात केली आहे.धान्य आणिकापड व्यापारही१९४० च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली होती. लोकांना पुरेसे व योग्य किमतीत धान्य मिळावे म्हणून या बँकेने धान्य तसेच कापड विक्री सुरू केली होती. बाजरी, ज्वारी, मिरची, चहापूड, आगपेट्या, तूरडाळ, तेल, आदी वस्तू विक्रीस उपलब्ध होत्या. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५० मध्ये दोन रेशनकार्ड दुकानेही ही बँक चालवीत होती. नंतर कालौघात केवळ आर्थिक व्यवहारच राहिले.