शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मसाई पठार संवर्धन क्षेत्रात समावेश नको, तेरा गावांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 14:54 IST

ForestDepartment- मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात आमच्या गावांचा समावेश करू नये अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील १३ गावांनी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याकडे केली आहे. बोरगे यांनी तातडीने याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहिले आहे.

ठळक मुद्देमसाई पठार संवर्धन क्षेत्रात समावेश नकोतेरा गावांच्यावतीने विजय बोरगे यांची मागणी

 कोल्हापूर : मसाई पठार संवर्धन राखीव क्षेत्रात आमच्या गावांचा समावेश करू नये अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील १३ गावांनी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याकडे केली आहे. बोरगे यांनी तातडीने याबाबत मुख्य वनसंरक्षक यांना पत्र लिहिले आहे.पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार परिसरात जैवविविधता आहे. तसेच बांदिवडे गावाजवळ दुर्मीळ अश्नीस्तंभ आढळतात. याच तालुक्यात ऐतिहासिक पांडव लेणी आहेत. त्यामुळे हा परिसर संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू आहे. बांदिवडे, बांदेवाडी, इंजोळे, पणुंदे, शिराळे तर्फ मलकापूर, आंबार्डे सावर्डे बु., वरेवाडी, परखंदळे, खोतवाडी, परळी, घुंगुर, सोनुर्ले, येळेवाडी या गावांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.अशा पध्दतीने संवर्धन राखीव क्षेत्रात या गावांचा समावेश झाल्यास या गावांवर अनेक निर्बंध येणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या राखीव क्षेत्रामध्ये गावांचा समावेश करण्यास या गावांनी विरोध केला आहे. मसाई पठार परिसर संरक्षित करण्यास आमची काही हरकत नाही. मात्र, या गावांचा राखीवमध्ये समावेश करून आमच्यावर बंधने आणून विकासाला बाधा नको असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या सर्वांनी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बोरगे यांनी तसे लेखी पत्र वनविभागाला दिले आहे.

या गावांच्या राखीव क्षेत्रातील समावेशावरून संभ्रम निर्माण झाला आहे. गावांच्या विकासावरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या गावांचा समावेश करू नये यासाठी वेळ पडल्यास आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत.-विजय बोरगे,जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर