शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

ब्रह्मवृंदाच्या एकजुटीचे दर्शन

By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST

औरंगाबाद : ब्रह्यवृंदाने एकसाथ, एका सुरात गणपती अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हणत एकजुटीचे दर्शन घडविले.

औरंगाबाद : ब्रह्यवृंदाने एकसाथ, एका सुरात गणपती अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हणत एकजुटीचे दर्शन घडविले. गणेशोत्सवाची सुरुवात चार वेदांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आली. विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण करण्यासाठी संस्थेच्या वतीने समाजबांधवांना आवाहन करण्यात आले होते. त्यास पाठिंबा देत शुक्रवारी सिडकोतील सप्तपदी मंगल कार्यालय ब्रह्यवृंदाने भरून गेले होते.वे.शा.सं. श्रीराम धानोरकर (ऋग्वेद), दुर्गादास शास्त्री मुळे (यजुर्वेद), दिनेश कुलकर्णी (अथर्ववेद), वासुदेव शास्त्री ठोसर (सामवेद), अशोक देव, भोगावकर गुरुजी यांनी एकानंतर एक चार वेदांचे मंत्रोच्चारण करून गणेशोत्सवास सुरुवात केली. संस्थेच्या महिला प्रतिनिधी प्रमुख अनुराधा पुराणिक यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज विखुरलेला आहे.या समाजातील बांधवांची एकजूट करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. समाजातील गरीब, गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणासाठी आर्थिक मदतही करतो. यावेळी उपक्रमांचा माहितीपट दाखविण्यात आला. प्रारंभी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक आर.सी. कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अनुया बावरकर यांनी केले. प्रकाश वझरकर यांनी आभार मानले. सोहळा यशस्वी होण्यासाठी रत्नाकर कुलकर्णी, रमेश पाथ्रीकर, प्रकाश वझरकर, कुलदीपक देशपांडे, अरविंद मोदी, अवधूत नाकाडे आदींनी परिश्रम घेतले.मंत्रोच्चाराने सर्व वातावरण मंगलमय झाले होते. संस्कृतच्या प्राध्यापिका मंजूषा कुलकर्णी यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे महत्त्व विशद केले. यानंतर विश्वकल्याणासाठी शांतीपाठ करण्यात आला. त्यानंतर सर्वत्र ओंकाराचा स्वर घुमला. ‘ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि’ असे उच्चारण करीत ब्रह्मवृंदाने अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हटली. यावेळी एकसाथ, एका सुरात, अथर्वशीर्ष म्हणताना सर्वांच्या चेहऱ्यावर तेज झळकत होते. मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेने उपस्थितांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. यास प्रतिसाद देत ५० जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीने केले.