कोल्हापूर : नागाळा पार्कातील पंचरत्न अपार्टमेंटसमोर रस्त्यावर उभारलेल्या मोटारीची काच फोडून अज्ञाताने आतील दहा हजार रुपये किमतीचा व्हिडोओ प्लेअर चोरुन नेला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. याबाबत दत्तात्रय शहाजी भोसले (वय ४०, रा. पंचरत्न अपार्टमेंट, नागाळा पार्क) यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय भोसले हे पंचरत्न अपार्टमेंटमध्ये राहतात. शनिवारी पहाटे १ वाजता ते बाहेरुन आले. त्यांनी अपार्टमेंटच्या दारातच रस्त्यावर मोटारकार उभी केली. सकाळी ६ वाजता त्यांच्या मोटारीच्या डाव्या बाजूची काच अज्ञाताने फोडल्याचे दिसून आले. चोरट्याने काच फोडून आतील पाच हजार रुपये किमतीचा व्हिडीओ प्लेअर व पाच हजारांचा टेप असा सुमारे १० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला.