शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

तंत्रशिक्षण मंडळाच्या गोंधळात विद्यार्थ्यांचा बळी

By admin | Updated: July 31, 2015 01:00 IST

अर्धवट पेपर तपासणी : पुरवण्या गायब होण्याचे प्रकार

संदीप खवळे / कोल्हापूर अर्धवट पेपर तपासणी, अख्खी पुरवणीच गायब, निकालपत्रक वेळेत नाही असा सावळा गोंधळ महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या कारभारात आढळून येत आहेत. गारगोटी येथील इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हील अँड रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यांत्रिकी शाखेत पदविकेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘इंजिनिअरिंग ड्रॉर्इंग’ या पेपरची एक पुरवणीच गायब झाली आहे. बोर्डाने पाठविलेल्या उत्तरपत्रिकेच्या फोटो कॉपीमध्ये ही पुरवणीच नाही. इंजिनिअरिंग ड्रॉर्इंग विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ४० गुणांची आवश्यकता आहे. संबंधित विद्यार्थ्यांला ३० गुण मिळाले आहेत. बोर्डाने न पाठविलेल्या पुरवणीमधील प्रश्नासाठी १६ गुण होते, पण पुरवणीच गहाळ झाल्यामुळे संबंधित प्रश्न तपासला गेलेला नाही. उलट एकाच प्रश्नाची पुरवणी दोनदा जोडल्याची तक्रार या विद्यार्थ्याच्या पालकाने केली आहे. याच कॉलेजमध्ये आयटी शाखेत शिकणाऱ्या निशिगंधा चौगले ह्या विद्यार्थिनीचा ‘अ‍ॅप्लाईड मॅथ्स्’ या विषयातील चार गुणांचा प्रश्न परीक्षकाने न तपासल्यामुळे ही विद्यार्थिंनी अनुत्तीर्ण झाली होती. तिला शंभरपैकी २९ गुण मिळाले. उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३० गुणांची आवश्यकता आहे. तंत्रशिक्षण मंडळाच्या ‘अ‍ॅन्सर की’प्रमाणे या प्रश्नाचे उत्तर निशिगंधा हिने अचूकपणे सोडविले होते. हा प्रश्न तपासला असता तर तिला ३३ गुण मिळाले असते. निशिगंधा हिच्या वडिलांनी बोर्डाकडून संबंधित पेपरच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवून घेतली असता, प्रश्नक्रमांक ६-सी तपासला नसल्याचे आढळले. फेरतपासणीमध्येही ही चूक बोर्डाच्या लक्षात आली नाही पण पालकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे निशिगंधा हिला न तपासलेल्या प्रश्नांसाठी दोन गुण देण्यात आले व ती उत्तीर्ण झाली. गुणपत्रिका देण्यासही तंत्रशिक्षण खात्याने आठ दिवस घालवले. या सावळा-गोंधळात अभियांत्रिकीच्या पदवीच्या प्रवेशासाठी शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीला गुणपत्रक मिळाले. प्रवेशास अर्ज भरण्यासाठी पालक-विद्यार्थिनीची प्रचंड धावपळ उडाली. तंत्रशिक्षण मंडळाच्या या सावळा-गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जागरूक पालकांचा अपवाद सोडला तर बोर्डाच्या या कारभारापुढे हात टेकल्याशिवाय पर्याय नाही. तंत्रशिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडूनही उडवाउडवीचे उत्तरेच मिळतात अन् महाविद्यालये बोर्डाकडे बोट दाखवितात. अनेक पालकांनी तंत्रशिक्षण खात्याच्या या कारभाराला कंटाळून फेरतपासणीचा नाद सोडला आहे, अशी माहिती या प्र्रकरणात तंत्रशिक्षण मंडळाच्या मुंबई कार्यालयापर्यंत पाठपुरावा केलेले पालक निवास चौगले यांनी दिली.