शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तमदलगे-अंकली रस्ता वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 20, 2015 00:01 IST

काम पूर्ण करण्याचे आव्हान : नुकसानभरपाई, जागेच्या प्रश्नामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

संदीप बावचे - जयसिंगपूर- ३१ मे पर्यंत कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश असले, तरी तमदलगे बसवान खिंड ते अंकली टोलनाका दरम्यानच्या मार्गावरील रस्त्यास अडथळा ठरणारी घरे, निमशिरगावची शाळा यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, आदी प्रश्न प्रलंबित आहेत. याप्रश्नी तमदलगे, निमशिरगाव व जैनापूर येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्यांतर्गत बसवान खिंड ते अंकली टोलनाका या दुपदरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. दुपदरी रस्त्याच्या कामासाठी संपूर्ण रस्ता उखडण्यात आला असून, या भागातील जैनापूर, तमदलगे, निमशिरगावमधील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून या खराब रस्त्याचा सामना करीत आहेत. तमदलगेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर अर्धवट पुलाचे बांधकाम झाले आहे, तर तमदलगे गावातील रस्त्यास अडथळा ठरणारी सुमारे ३५ घरे व तीन धार्मिक मंदिरे काढण्याशिवाय पर्याय नाहीत. या घरातील लोकांचे पुनर्वसन होणार की, त्यांना मूल्यांकनाप्रमाणे भरपाई मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याप्रश्नी गावातील लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अजूनही दखल घेतलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून तमदलगे-जैनापूर-निमशिरगाव मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता उखडल्यामुळे रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. रस्ता सुरळीत नसल्यामुळे जयसिंगपूर-निमशिरगाव एस.टी. व्हाया चिपरीमार्गे येत आहे. चिपरी-जैनापूर रस्त्याचीही अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरून चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे. हा रस्ता ठेकेदार कंपनीनेच करून देण्याचे आहे. मात्र, या प्रश्नाकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. जयसिंगपूर रेल्वेस्थानक ते अंकली टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्याचीदेखील अवस्था दयनीय आहे. या रस्त्यावरील ओढ्यावर पर्यायी पूल बांधण्याची गरज आहे. या पुलाच्या बांधकामास अजून सुरुवातच नाही. अनेक समस्यांच्या गर्तेत हा बायपास रस्ता सापडला असताना ३१ मेपर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.अपघातास निमंत्रणबायपास मार्गावर दानोळी व उमळवाड फाटा येतो. मात्र, दुपदरीकरण करीत असताना कोणतेही नियोजन ठेकेदार कंपनीने केलेले नाही. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही फाट्याजवळ दानोळी व उमळवाडहून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या शक्यता नाकारता येत नाहीत. यामुळे एकतर भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल किंवा सेवामार्ग करणे गरजेचे आहे.आंदोलनकर्ते गायबवर्षभरापूर्वी अंकली फाटा ते तमदलगे खिंड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याच्या कामात मातीचा भराव टाकला जात आहे, असा आरोप करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अजूनही रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतानाही आंदोलनकर्ते मात्र गायब झाले आहेत. त्यामुळे कोणी लोकप्रतिनिधी याप्रश्नी आवाज उठवणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.