शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कुलगुरूंनी सत्यशोधन समितीद्वारे सुनावणी घ्यावी ; ‘सुटा’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 16:48 IST

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर, भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी ‘सुटा’च्या आठ सदस्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कुलगुरूंनी सत्यशोधन समिती स्थापन करून त्यामार्फत सुनावणी घ्यावी, अशी मागणी यावेळी ‘सुटा’ने केली.

ठळक मुद्देकुलगुरूंनी सत्यशोधन समितीद्वारे सुनावणी घ्यावी ; ‘सुटा’ची मागणीशिवाजी विद्यापीठासमोर लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर, भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी ‘सुटा’च्या आठ सदस्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कुलगुरूंनी सत्यशोधन समिती स्थापन करून त्यामार्फत सुनावणी घ्यावी, अशी मागणी यावेळी ‘सुटा’ने केली.‘सुटा’ने दि. १० फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या कार्यकारिणीमध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कारभाराविरुद्ध पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘सुटा’च्या सदस्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

त्यामध्ये डॉ. गजानन चव्हाण, एस. वाय. पाटील, उषा पाटील (कोल्हापूर), युवराज पाटील (सांगली), तानाजी कांबळे, ए. एन. भिंगारे, व्ही. बी. सुतार, सुरेश पोळ (सातारा) यांचा समावेश होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ‘सुटा’ सदस्य प्रा. एम. एल. सोनटक्के, सचिन बोलाईकर, एच. डी. पाटील, ‘सुटा’चे उपाध्यक्ष प्रा. अरुण पाटील, खजिनदार प्रा. इला जोगी, आदी उपस्थित होते.

कुलगुरूंची चौकशी व्हावी, अशी ‘सुटा’ची मुख्य मागणी आहे. कुलगुरूंनी ‘सुटा’चे कोणतेही आरोप अद्याप अमान्य केल्याचे लेखी स्वरूपात कळविलेले नाही. त्यांनी त्याबाबत जाहीर सुनावणी घ्यावी, अशी ‘सुटा’ची मागणी आहे. त्यांनी सत्यशोधन समितीही स्थापन करून त्यामार्फत सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. पण, त्याबाबत कुलगुरू सकारात्मक नाहीत.संलग्नीकरणाच्या अटी, विद्यापीठाचे निर्देश, तक्रार निवारण समितीचे निर्णय, आदींचा भंग करणाऱ्या महाविद्यालय, व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने कडक दंडसंहिता लागू केली आहे. ती दंडसंहिता कुलगुरूंनी दडवून ठेवली आहे. माहितीच्या अधिकाराखाली ‘सुटा’ने विद्यापीठ प्रशासनाला १२ अर्ज दिले आहेत. काही प्रकरणांबाबत जाणीवपूर्वक माहिती देण्याचे टाळले आहे, असे ‘सुटा’चे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले.

आता १४ मार्चला धरणे आंदोलन‘सुटा’च्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना बुधवारी (दि. ६) विविध मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलन तीव्र करण्याच्या निर्णयानुसार दि. १४ मार्च रोजी ‘सुटा’तर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले जाईल, असे प्रा. जाधव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर