शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पी. एस. पाटील  : पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:25 IST

Shivaji University, EducationSector, Kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. डॉ. प्रमोद शंकरराव तथा पी. एस. पाटील यांची नियुक्ती झाली. ते सध्या विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागाच्या प्रमुखपदी कार्यरत आहेत. त्यांच्या प्र-कुलगुरूपदावरील नियुक्तीचा ई-मेल सायंकाळी पाच वाजता कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाकडून विद्यापीठ प्रशासनाला मिळाला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पी. एस. पाटील  कुलपतींकडून नियुक्ती : पदभार स्वीकारला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. डॉ. प्रमोद शंकरराव तथा पी. एस. पाटील यांची नियुक्ती झाली. ते सध्या विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागाच्या प्रमुखपदी कार्यरत आहेत. त्यांच्या प्र-कुलगुरूपदावरील नियुक्तीचा ई-मेल सायंकाळी पाच वाजता कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाकडून विद्यापीठ प्रशासनाला मिळाला.विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या डॉ. पाटील यांनी सातवे प्र-कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. या पदावरील नियुक्तीसाठी आठजण इच्छुक होते. त्यातील तीनजणांची नावे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गेल्या महिन्यात कुलपतींना पाठविली होती. त्यानंतर गुरुवारी या पदावर डॉ. पाटील यांची नियुक्ती झाल्याची माहिती कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठाला कळविण्यात आली.

डॉ. पाटील यांचे मूळ गाव दुंडगे (ता.चंदगड) आहे. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञान विषयात बी.एस्सी. केली. त्यानंतर विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना अध्यापन, संशोधनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे.

विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कार्यकाळाइतका डॉ. पाटील यांचा प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाळ असणार आहे.

शिवाजी विद्यापीठात गेली ३० वर्षे मी कार्यरत आहे. संशोधनात विद्यापीठाला गती मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यात यशस्वी झालो. गेली पाच वर्षे अधिष्ठातापदी काम केल्याने मला प्रशासनाचा अनुभव आहे. प्र-कुलगुरूपदाच्या माध्यमातून विद्यापीठात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण अध्ययन, अध्यापन प्रणाली आणि विशेषतः संशोधन विकासावर भर देण्याचा माझा प्रयत्न राहील.-डॉ. पी. एस. पाटील

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर