शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 18:23 IST

ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.

ठळक मुद्देज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचे निधनत्यांच्या इच्छेनुसार देहदान

कोल्हापूर : ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे मुलगा डॉ. आशिष, मुलगी डॉ. तृप्ती, बहीण साहित्यीका डॉ. लीला पाटील, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनुराधा गुरव या मुळच्या सोलापुरातील बाळे गावच्या. वडिल वतनदार रंगनाथ पाटील हे पुरोगामी विचारांचे. त्यामुळे त्यांनी पाचही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. पुढे १९६५ साली मौनी विद्यापीठात गणित आणि विज्ञान विषयांची शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. 

कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, बालसाहित्य,समीक्षण, नवसाक्षर , शैक्षणिक, लेख अशा सर्व लेखन प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली.माध्यमीक शाळा, बीएड महाविद्यालये, पॉलिटेक्निकमध्ये अध्यापनासोबतच प्राचार्य, संचालक, विभाग प्रमुख अशा विविधपदांवर त्यांनी काम केले. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागात काम केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून सेवा बजावली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

विधिसेवा प्राधिकरण, बाल न्याय मंडळ, कौटूंबिक प्रश्न निर्मूलन, लोकन्यायालय, जिल्हा बालन्यायालय अशा विविध समित्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना, विद्यापीठाच्या तालुका, जिल्हा न्यायालयांच्या कायदा सल्ला समितीमध्ये २५ वर्षे काम करताना त्यांनी नागरिकांचे प्रश्न हाताळले.   आपुलकी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य सुरु ठेवले.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, श्री. द. पानवलकर, साहित्य रत्न, वुमेन्स फौंडेशनचा साहित्य भूषण अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले.  त्यांचे ३० कथासंग्रह, १३ कादंबर्‍या, एकांकिका संग्रह, बालसाहित्याची ३० पुस्तके, नवसाक्षर साहित्याची ४३ पुस्तके, शैक्षणिक १२ पुस्तके, लेखसंग्रह १६ पुस्तके असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर