शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

कागदपत्रांची पडताळणी ७२ तासांत करा

By admin | Updated: July 5, 2017 00:54 IST

संजय मोहिते यांचे आदेश : पासपोर्ट कार्यालयाकडे १९०० अर्ज प्रलंबित; लोकांची गैरसोय दूर करणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. सध्या पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट कार्यालयात सुमारे १९०० अर्ज प्रलंबित आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्णातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. चार महिन्यांपूर्वी कसबा बावडा येथील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात दरदिवशी २०० अर्ज दाखल होतात. या ठिकाणी पासपोर्ट अर्ज स्वीकारणे आणि देण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, कऱ्हाड येथील लोकांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अर्जांची पडताळणी वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी पासपोर्ट केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. पोलीस अधीक्षक मोहिते यांनी या तक्रारींची दखल घेत मंगळवारी सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत अर्जांची पडताळणी करून ते पासपोर्ट केंद्राला पाठविण्याचे आदेश दिले. +कार्यालयीन घोळ संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो. काहीवेळा कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिभार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काहीवेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करीत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो. अशी होते प्रक्रिया पासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो. तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर ओळखपरेड करून सही घेऊन तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जातो. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जातो. याठिकाणी उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर त्यांना जावक क्रमांक देऊन तो अर्ज पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. तेथून अर्जाला अंतिम मंजुरी मिळताच संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राकडे पाठविला जातो. कार्यालयीन घोळ संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो. काहीवेळा कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिभार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काहीवेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करीत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो.