शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

वटहुकुमावरील याचिका सोमवारी निकालात काढा

By admin | Updated: March 15, 2016 01:24 IST

सुप्रीम कोर्टाचे आदेश : अपात्र संचालक प्रकरण

कोल्हापूर : राज्य सरकारने काढलेल्या सुधारित वटहुकुमाबाबत उच्च न्यायालयात सुरू असणारी याचिका सोमवारी (दि. २१) निकालात काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाला दिले. या निर्णयामुळे आज, मंगळवारी विभागीय सहनिबंधकांकडे होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून नवीन वटहुकुमामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची टांगती तलवार आहे. वटहुकुमाविरोधात हे संचालक उच्च न्यायालयात गेले आहेत. सुरुवातीला ही याचिका खंडपीठासमोर चालली, पण सरकारने मुख्य न्यायाधीशांसमोर याचिका चालवावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांसमोर सोमवारी (दि. २१) सुनावणी होणार आहे; पण तत्पूर्वी आज विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्यासमोर (पान १ वरून) वटहुकुमानुसार कारवाईची सुनावणी होणार होती. संचालकांना म्हणणे सादर करण्यासाठी तीनवेळा संधी दिल्याने कदाचित मंगळवारी दराडे थेट अपात्रतेचे आदेश काढतील, याचा अंदाज आल्याने कोल्हापूर व नाशिक जिल्हा बँकेच्या संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सोमवारी सुनावणी होऊन शासनाच्या वटहुकुमाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी संचालकांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती गोपाळ गौडा व न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर केली. यावर उच्च न्यायालयाच्या याचिकेवरील निर्णय होईपर्यंत शासन कोणतीही कारवाइर्ख करणार नाही, असे निवेदन शासनाच्यावतीने अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. तुषार मेहता यांनी न्यायालयात केले. त्यावर उच्च न्यायालयाने याबाबत दि. २१ मार्चला होणाऱ्या सुनावणीत याचिका निकालात काढावी, असे आदेश खंडपीठाने दिले. कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या वतीने सिनियर अ‍ॅड. कपिल सिब्बल, अ‍ॅड. अरविंद दातार, अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. श्रीनिवास पटवर्धन यांनी तर नाशिक जिल्हा बँकेच्यावतीने सिनियर अ‍ॅड. ए. के. वेणूगोपाल व अ‍ॅड. सत्यजित देसाई यांनी काम पाहिले. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने अ‍ॅड. तुषार मेहता यांनी बाजू मांडली. राज्य बॅँकेसह जिल्हा बॅँकांतील बड्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने आता उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. तीन जिल्हा बँकांतील १९ संचालकांवर टांगती तलवारया वटहुकुमामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अकरा, सांगली जिल्हा बँकेचे सात व सातारा जिल्हा बँकेचे एक अशा १९ विद्यमान संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आता सोमवारीच होणार आहे. ेहनिबंधकांकडील सुनावणी स्थगित उच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे निवेदन सरकारच्यावतीने केल्याने सहनिबंधकांसमोरील आज, मंगळवारी होणारी सुनावणी स्थगित झाल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.