प्राचार्य एस. बी. गुरव यांनी स्वागत केले. संचालक सुनील देसाई यांनी शाळेबद्दल माहिती दिली. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा संस्थेतर्फे शिंपी यांच्या हस्ते सत्कार झाला.
आजरा तालुक्यतील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यातर्फे आमदार आसगावकर यांचा सत्कार करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आजरा महाल शिक्षण मंडळ अंतर्गत सर्व शाळांतील शिक्षकांमुळे मला आमदार होता आले. त्यामुळे आजरा तालुक्यातील शाळांतील शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देईन, असे आश्वासन आमदार प्रा. आसगावकर यांनी दिले. आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सचिव एस. पी. कांबळे, खजिनदार एस. डी. चव्हाण, संचालक अप्पासाहेब देसाई, नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे, पांडुरंग देसाई, मधुकर यलगार यांच्यासह आजरा तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, व्यंकटराव प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------------
फोटो ओळी : आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलमधील आय. टी. लॅबचे उद्घाटन करताना आमदार प्रा. जयंत आसगावकर. शेजारी जयवंत शिंपी व मान्यवर उपस्थित होते.
क्रमांक : २१०३२०२१-गड-०९