शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील वाहनांना पासचा काहीच फायदा नाही

By admin | Updated: May 22, 2015 00:55 IST

प्रवेशकर प्रश्न : वगळलेल्या बेळगाव, सिंधुदुर्ग, कारवारला पुन्हा कराची झळ

कोल्हापूर : मालवाहतूक वाहनांसाठी गोवा राज्याने आकारलेला प्रवेश कर (एंट्री टॅक्स) हा कोल्हापूर जिल्ह्णाला पूर्वीपासूनच आहे. त्याचा काही फायदा नाही उलट, या प्रवेश करामधून वगळण्यात आलेल्या बेळगांवसह कारवार, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्णांना आता या कराची पुन्हा झळ बसणार आहे. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तीन जिल्ह्णांना प्रवेशकरामधून वगळले होते.कोल्हापूर जिल्ह्णातून रोज मालवाहतूक (उदा. ट्रक, टेम्पो, टँकर) जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गोवा येथे केला जातो. गोवा सरकारने परराज्यांतून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांसाठी प्रवेशकर लागू केलेला आहे. रोज कोल्हापूर जिल्ह्णातून साधारणत: शंभर ते सव्वाशे, सिंधुदुर्गमधून २० ते २५ , बेळगावमधून ७० ते ८० तर कारवारमधील छोटे-मोठे टेम्पो अशा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आहे. विशेषत : कोल्हापूर व बेळगांव या जिल्ह्णामधून रोज गोवा येथे भाजीपाला, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जास्त होतो. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी या चार जिल्ह्णातील मालवाहतूक करणाऱ्या संघटनांनी त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन प्रवेश कर रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रवेश कर रद्द करतो, असे आश्वासन दिले होते, पण, पर्रीकर सरकारने कोल्हापूर जिल्हावगळून तीन जिल्ह्णांचा प्रवेश कर रद्द केला. या विरोधात प्रवेश करप्रश्नी दीड वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्णातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गोव्याला सहा दिवसांसाठी बंद केला होता. दरम्यान, गोवा सरकारने आता या जिल्ह्णांना एक जूनपासून प्रवेश करामध्ये नियमित पास देण्याचे ठरविले आहे परंतु, कोल्हापुरातील मालवाहतूकदारांना या नियमित पास सवलतीचा कोणताही फायदा होणार नाही.अशी होतेय प्रवेश कराची आकारणी...वाहनांचा प्रकारदर (रुपयांत) चार चाकी २५० रुपयेसहा चाकी५०० रुपयेदहा /१२ चाकी१००० रुपये प्रवेश कराबाबत दोन वर्षे लढा दिला. त्यासाठी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर बैठक झाली. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्णाला प्रवेशकरामधून वगळतो, असे आश्वासन दिले होते, पण तसे झाले नाही. हा प्रवेशकर आम्ही ग्राहकांच्या खिशांमधून घेतो. उलट, आता या प्रवेशकरामुळे तीन जिल्ह्णांवर अन्याय झाला आहे तेथील मालवाहतूकदार संघटनांनी याविरोधात उठाव केला पाहिजे. - सुभाष जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर असोसिएशन.