शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

वाहन तपासणी केंद्राची पालिकेस माहिती नाही

By admin | Updated: October 6, 2015 00:24 IST

कागल नगरपालिका सभा : पत्रव्यवहार करूनही दखल नाही; चौकशी करण्याचा ठराव

कागल : कागल नगरपालिका हद्दीत असतानाही प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे तब्बल ४२ एकर क्षेत्रात गेली वर्षभर नवीन वाहन तपासणी केंद्र उभारण्यासाठी बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, यासाठी कागल नगरपरिषदेला त्यांनी कोणतीच माहिती सादर केलेली नाही. पत्रव्यवहार केला असता त्यांची दखलही घेतली नाही म्हणून या प्रकाराची कायदेशीर चौकशीचा ठराव सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. मुख्याधिकारी प्रभाकर पत्की प्रमुख उपस्थित होते. या सभेला १७ पैकी केवळ सात नगरसेवक उपस्थित होते. तपासणी केंद्र उभारताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नगपालिका हद्दीत असतानाही पालिकेची दखल घेतलेली नाही. या बांधकाम नियमावलीनुसार शासनाचे काम असल्याने प्रस्तावीत कामाचे नकाशे माहितीसाठी पालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे. नगरपरिषदेच्या वतीने शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये हा प्रकल्प दाखविणे कायदेशीर असताना पत्रव्यवहार करूनही या कार्यालयाने दखल घेतली नसल्याने कायदेशीर कारवाईसाठी चौकशीचा निर्णय घेतला. विषय पत्रिकेवर ३६ विषय होते. त्यामध्ये जयसिंगराव तलावात विहिरीतून पाणी सोडणे, घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती, प्रकल्पासाठी १ कोटी ४६ लाख रुपयांचे मशीन खरेदीचे पैसे देणे, कोरवी समाज मंदिर जागेत सांस्कृतिक हॉल बांधणे, नवीन पदभरती करणे, जलतरण तलाव, शाहू क्रीडांगण, बोटिंग क्लब चालविण्यास देण्यासाठी नवीन ठेका काढणे, विविध विकासकामे यांना मंजुरी दिली. शिक्षक मारुती व्हरकट यांच्याबद्दल आलेल्या तक्रारीबाबत चौकशी समिती नेमण्याचा निर्णयही झाला. चर्चेत पक्षप्रतोद रमेश माळी, विरोधी नगरसेवक भैया इंगळे, संजय कदम, आशाकाकी माने, रंजना सणगर, अंजुम मुजावर यांनी सहभाग घेतला. स्मारकास जागाया सभेत ज्युदो खेळाडू उदय नागराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर भैया इंगळे यांनी कै. विक्रमसिंहराजे घाटगे आणि कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारकांसाठी नगरपालिकेने जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी केली. त्यास सर्वांनी सहमती दिली. ३६ विषय असूनही अवघ्या तासाभरात सभा झाली.सत्ताधारी गटातील धुसफूस चव्हाट्यावर...जहाँगीर शेख ल्ल कागलकागल पालिकेच्या निवडणुकीसाठी आता फक्त एक वर्षाचा कालावधी बाकी असताना सत्ताधारी गटात सुरू असलेली अंतर्गत धुसफूस सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. सभेस सत्ताधारी आघाडीतील शाहू आघाडीचे सर्व नगरसेवक गैरहजर राहत, तर राष्ट्रवादी काँगेसच्याही चार नगरसेवकांनी दांडी मारल्याने ‘कोरम’ पूर्ण होण्याचा प्रश्न निर्माण झाला. या प्रकाराची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती; मात्र अनुपस्थितीत नगरसेवकांनी याविषयी वैयक्तिक कारणे सांगत दांडी मारण्याच्या प्रकारावर उघड भाष्य करणे टाळले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ही सभा बोलविण्यात आली होती. काही नगरसेवक गैरहजर राहणार आहेत ही चर्चा सकाळी नऊ वाजल्यापासून पालिक वर्तुळात सुरू होती. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सभागृहात १७ पैकी सात नगरसेवक जमले. त्यामध्ये विरोधी गटाचे संजय कदम, भैया इंगळे, तर सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा संगीता गाडेकर, पक्षप्रतोद रमेश माळी, आशाकाकी माने, अंजूम मुजावर, रंजना सणगर यांचा समावेश होता. संजय कदम, भैया इंगळे यांनी कोरमअभावी सभा ‘रद्द’ करावी, सभेला दांडी मारण्यामागची कारणे काय? नगरसेवकांची अनुपस्थिती अयोग्य आहे, अशी टीका केली. पक्षप्रतोद रमेश माळी यांनी १७ पैकी सात सदस्य सभागृहात असल्याने कायद्याने एकतृतीयांश सदस्य व कोरम पूर्ण होतो असा नियम सभागृहात सादर केल्याने सभेला रीतसर सुरुवात झाली. कागल पालिकेसाठी ‘कोरम’चा प्रश्न निर्माण व्हावा ही खेदजनक बाब असल्याची टीका विरोधी नगरसेवकांनी केली, तर नगराध्यक्षा आणि पक्षप्रतोद यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले. पण, आजच्या सभेस ‘दांडी प्रकरणा’वर शहरभर चर्चा सुरू होती.१७ पैकी १० नगरसेवक गैरहजरसभेस दांडी मारलेले नगरसेवकराष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चित्रारी, प्रवीण गुरव, रणजित बन्ने, बेबीताई घाटगे, अजित कांबळे, राजू डावरे (स्वीकृत) शाहू आघाडीच्या उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, मारुती मदारे, सन्मती चौगुले, मनोहर पाटील (स्वीकृत), नम्रता कुलकर्णी, सुमन कुऱ्हाडे यांनी सभेस दांडी मारली; मात्र या मागे ठरवून काही नव्हते. वैयक्तिक कामामुळे येता आले नाही, अशी कारणे काहींनी सांगितली. दांडी प्रकरण नेतेमंडळींपर्यंत पालिकेत राजे-मुश्रीफ गटाची संयुक्त सत्ता आहे. प्रामुख्याने विकासकामांचा निधी वाटप या विषयावर नगरसेवकांच्या मागे सुरुवातीपासूनच नाराजी आहे. पार्टी मिटिंगमध्ये यावर जोरदार चर्चा झाल्या आहेत. मात्र, चार वर्षांत पहिल्यांदाच असे ‘दांडी’ प्रकरण घडल्याने हे प्रकरण आता आ. हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यापर्यंत पोहोचले आहे.