शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांचे ‘खड्डे भोजन’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:16 IST

‘शिवाजी चौक ते गंगावेश’ हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच; परंतु चालणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे; त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन बुधवारी हे खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे कोल्हापुरातील ‘शिवाजी चौक ते गंगावेश’ रस्त्यावरील खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी वाहनधारक महासंघातर्फे चप्पल लाईनला खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर : मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंगावेश रस्त्याचे काम रखडल्याबद्दल येथील कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘खड्डे भोजन’ करून या रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.देशभरात नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना, कोल्हापुरात मात्र वाहनधारक महासंघाने रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी खड्ड्यात बसून खर्डा भाकरी खाऊन महापालिकेचा निषेध केला.

‘शिवाजी चौक ते गंगावेश’ हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच; परंतु चालणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे; त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन बुधवारी हे खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांवर रांगोळीही रेखाटण्यात आली होती. जर या आंदोलनातून पालिका प्रशासनाला जाग आली नाही, तर अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यात बसविण्यात येईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व अभिषेक देवणे, चंद्रकांत भोसले, दिलीप सूर्यवंशी, विजय गायकवाड, राजेंद्र जाधव, राजू नागवेकर, भरत चव्हाण, पुष्पक पाटील, विनोद जाधव यांनी केले.महापालिकेचा दावा -* रस्त्याचे काम मंजूर असून, निधीसुद्धा उपलब्ध.* जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने रस्त्याचे काम थांबविले.* जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या ठेकेदारास सूचना. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा