शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आवक मंदावल्याने भाजीपाला, कांदा कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून, किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून, किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असून, भाव मात्र तेजीत दिसत आहेत.परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्टÑात धुमाकूळ घातल्याने खरीप पिकांचे नुकसान झालेच पण त्याबरोबर भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर दिसून येत असून, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज होणाºया भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात विविध भाज्यांची पाचशे क्विंटलने आवक मंदावली आहे. आवक कमी झाल्याने दरात कमालीची वाढ झाली असून, घाऊक बाजारात गतआठवड्यात १७ रुपये किलो असणारा कोबी आता तब्बल ४२ रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात वांगी ऐंशी रुपये किलो, तर वरणा, गवार, कारली, भेंडी, दोडक्याचे दर चांगलेच भडकले आहेत. पालेभाज्यांची आवकही कमी झाली असून किरकोळ बाजारात मेथी वीस रुपये पेंढी तर पोकळा, पालक, शेपू दहा रुपये पेंढी दर राहिला आहे.दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम थंड दिसत आहे. तूरडाळ, हरभराडाळ, मूग, मसूर डाळीचे दर स्थिर आहे. सरकी तेल, शेंगतेल, खोबरेल तेलाच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. पोहे, साखर, शेंगदाणाचे दर स्थिर आहेत. परतीच्या पावसाचा झटका कांदा उत्पादकांनाही बसला असून, आवक कमी झाली आहे.गत आठवड्यापेक्षा बाजार समितीत दोन हजार क्विंटलने कांद्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम थेट दरावर झाला असून, घाऊक बाजारात किलोमागे सरासरी १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याने चाळिशी ओलांडली आहे.बटाटा, लसणाच्या आवक व दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये सफरचंद, मोसंबी, संत्री, डाळींब, चिक्कूची आवक चांगली आहे. सफरचंद ऐंशी रुपये किलो तर चिक्कू तीस रुपयांपासून दर आहे.गुळाची आवक वाढलीपाऊस कमी झाला आणि दिवाळी संपल्याने गुºहाळघरांची धुराडे आता पेटू लागली आहेत. त्यामुळे बाजार समितीत गुळाची आवक वाढली असली तरी दरात फारसा फरक दिसत नाही.