शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

 भाजीपाल्यांचे दर स्थिर, अननस, तोतापुरी आंब्यांची आवक वाढली, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:09 IST

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.

ठळक मुद्देअननस, तोतापुरी आंब्यांची आवक वाढली, दर घसरले भाजीपाल्यांचे दर स्थिर

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे विक्रेते व शेतकरीही महापालिकेच्या नावाने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, पावसामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी फळ व पालेभाज्यांचे दर स्थिरच आहेत. कोंथिबीर, आले अजूनही वाढूनच आहेत. तोतापुरी व अननसांनी बाजार भरला असून, दरही १0 ते २0 रुपये प्रती नग झाले आहेत.महापालिकेने स्वच्छता केल्याचे नाटक केले असले, तरी रविवारी बाजार भरल्यावर यातील फोलपणा दिसला आहे. गटारी तुंबून सर्व सांडपाणी संपूर्ण बाजारपेठेतील मुख्य मार्गावर पसरल्याने भाजी विकायची आणि खरेदी तरी कशी करायची, असा प्रश्न करत पाण्यातूनच वाट काढत खरेदी-विक्री सुरू होती. त्यातच पावसाच्या अधूनमधून सरी येत असल्याने या दलदलीत आणखीन भर पडत होती.दोन दिवसांपासून संततधार बरसणाºया पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. मागणी नसल्याने दर मात्र गेल्या आठवड्याइतकेच स्थिर आहेत. वांगी, भेंडी, कारली, गवार, दोडका, ढबू ३0 ते ४0 रुपये किलो आहेत. दुधी भोपळा, पडवळचे बाजारात आगमन झाले आहे. कोबी, फ्लॉवर १0 ते २0 रुपये गड्डा आहे.

मेथी अजूनही दुर्मीळ असून, २0 ते २५ रुपये पेंढी असा दर कायम आहे. कोथिंबिरीचे दर्शन बाजारात दुर्मीळ झाले आहे. दरही मागील आठवड्याप्रमाणे ४0 ते ५0 रुपये पेंढी असेच चढे आहेत. पालक, पोकळा, लाल भाजी, तांदळी १0 ते १५ रुपये पेंढी आहे. लिंबूंचे दर उतरले असले, तरी आल्याचे दर वाढत चालले आहेत. ८0 रुपये किलो असणारे आले आता १५0 रुपये किलोवर पोहोचले आहेत.पावसाचा सर्वाधिक फटका फळ बाजाराला बसला आहे. हापूस आंब्याचा हंगाम संपला असून, त्याची जागा तोतापुरी आंब्यांनी घेतली आहे. २५ ते ३५ रुपये दराने विकला जाणारा तोतापुरी आंबा आता १0 रुपयांना तीनप्रमाणे विकला जात आहे. मोठ्या आकाराचा आंबा १५ ते २0, तर लहान आंबे १0 रुपयांना तीन आहेत. हीच परिस्थिती अननसाचीही झाली आहे. १0 ते ४0 रुपये असे दर आहेत. बाजारात सर्वत्र अननसच दिसत आहेत.टोमॅटोचे ढीगबाजारात टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. १0 ते २0 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. मागील आठवड्यात हेच दर ४0 रुपयांवर पोहोचले होते. टोमॅटो स्वस्त झाल्याने बाजारात लालभडक टोमॅटोचे ढीग वाढू लागले आहेत.बाजारात व्यापाऱ्यांची गर्दीपाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणी व आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत; त्यामुळे बाजारात विक्रीसाठी बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमालीची रोडावली आहे. संपूर्ण बाजारपेठेत व्यापाऱ्यांची गर्दी दिसत आहे. बाजारपेठेत पाणी साचल्याने खाली बसण्याची सोय नसल्यानेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर