शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वारणा, कृष्णेला पुराचा धोका

By admin | Updated: August 7, 2016 01:10 IST

सांगलीत पाणीपातळी ३२ फुटांवर : शिराळ्यातील चार पूल पाण्याखाली; पावसाचा जोर कायम

सांगली : चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासांत १०३ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाचे चारही दरवाजे शनिवारी सायंकाळी दोन मीटरने उचलून २५ हजार क्युसेकने विसर्ग वारणा नदीत सोडला आहे. त्यामुळे मांगले-काखेसह चार पूल पाण्याखाली गेले. सातारा जिल्ह्यातील धोम आणि कण्हेर धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडले आहे. आज, रविवारी कोयना धरणाचेही दरवाजे उचलण्यात येणार असल्याने कृष्णेला पूर येण्याची शक्यता आहे. सायंकाळी औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मंदिरात कृष्णेचे पाणी शिरले. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी रात्री आठला ३२ फुटांवर पोहोचली होती.शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. शिराळा आणि इस्लामपूर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असल्यामुळे धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे २५ हजार क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे. कोयनेचे दरवाजे उघडणारसातारा जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील २,१११ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. कोयनेचे सहा वक्री दरवाजे आज, रविवारी दुपारी दोन वाजता तीन फुटांनी उघडून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.श्रीक्षेत्र औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मंदिरामध्ये शनिवारी १० दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा कृष्णा नदीचे पाणी शिरले. त्यामुळे सकाळी खालच्या मंदिरातून देव वरच्या जुन्या मंदिरामध्ये हलविण्यात आले.