शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

खजुराचे प्रकार अनेक

By admin | Updated: June 30, 2014 00:43 IST

कोल्हापूरकरांना लागतो दरमहा दहा टन खजूर : ७० रुपयांपासून १२५० रुपये प्रतिकिलो मिळतो खजूर

सचिन भोसले ल्ल कोल्हापूरखजूर म्हटले की, रमजान रोजे आणि नवरात्रातील उपवासांची आठवण होते. या खजुरांमध्ये आपल्याला ‘जायदी’ खजूरच माहीत आहे. मात्र, कोल्हापूरच्या बाजारात खजुराचे दहापेक्षा अधिक प्रकार येतात. विशेष म्हणजे इराण, इराक, ट्युनिशिया या देशांतून थेट कोल्हापूरच्या बाजारात खजूर विक्रीसाठी येतो. विशेष बाब म्हणजे या खजुराची किंमतही अगदी ७० रुपये किलोपासून १२५० रुपये किलोपर्यंत आहे. रमजान रोजेकरिता खजुराची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. साधारणत: कोल्हापूरसाठी केवळ रमजान महिना गृहीत धरल्यास ४० टन इतका खजूर लागतो, तर नवरात्रामध्ये १५० टन इतकी आवक व विक्रीही होते. याचबरोबर महिन्याला सर्वसाधारणपणे दहा टन खजूर लागतो. असा हा खजूर कसा आहे ते जाणून घेऊ ‘लोकमत’संगे. प्रामुख्याने आखाती देशांमध्ये खजूर पिकविला जातो. या झाडांची उंची साधारणत: २१ ते २३ मीटर इतकी उंच असते. प्रत्येक खजुरामध्ये २० ते ७० कॅलरिज असू शकतात. असा हा खजूर अर्थात इंग्रजीमध्ये याला ‘ड्याकटीलीफेरा’ व ‘डेटस’ असेही संबोधले जाते. प्रामुख्याने खजुरामध्ये ‘बरही, हलवे, खादके, मेडजाल, जायदी, फरद, आजव्हा, अल्बराक, अमीर हज, बराकवाई, खलाशह, रजश्तावी, मिशरीक, मदिनाथ, मॅक्झूल, मरियम, मझाहपती, मॅजेस्टिक, तर डेरी, डेगलेट, नूर, झडी या मध्यम सुक्यामधील प्रमुख जाती आहेत. याचबरोबर युरी जातीचा सुका खजूरही पिकविला जातो. विशेष म्हणजे हे सर्व खजूर आता कोल्हापूरच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ‘मेडजोल’ हा सर्वांत महागडा खजूरही कोल्हापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याचा दर १२५० रुपये प्रतिकिलो इतका आहे.