कोल्हापूर : शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज, शनिवारी कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहर शिवसेना शाखेच्या वतीने शहर कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर एक हजार गरजू कुटुंबांना दहा लाख किमतीच्या जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
त्याचबरोबर शिवसेना जिल्हा कार्यालयात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता पद्मा टॉकीज येथील जिल्हा कार्यालयात अंगणवाडीसेविका व आशा वर्कर्सना छत्री वाटप केल्या जाणार आहेत. येथे केक कापला जाणार असून, सकाळी ११.३० वाजता म्युकरमायकोसिस व कोरोना आजारावर उपचार करणाऱ्या लढवय्या डॉक्टरांचा सत्कार सीपीआर येथील पंचगंगा हॉलमध्ये होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.