यावेळी छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पसायदान व भक्तिगीते सादर केली तर विविध ज्येष्ठ मान्यवरांनी बापूंच्या आठवणींना उजाळा दिला व आदरांजली वाहिली.
याप्रसंगी संस्थेचे निवृत्ती शिंदे, हिंदुराव तेली, वारणेचे संचालक धोंडिराम सिद, राजवर्धन मोहिते, प्रभाकर कुरणे, शिवाजी धर्मे, अशोक जाधव, जगन्नाथ पाटील, बी. जी. बोराडे, तुकाराम कोळेकर, हिंदुराव पाटील, पांडुरंग जाधव, राजेंद्र पाटील यांच्यासह श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व स्व. किसनबापू जाधव इंग्लिश मेडियम स्कूलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी, विद्यार्थी, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद कार्यकर्ते, खेळाडू व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळी..घुणकी गावचे लोकनेते स्व. किसन बापू जाधव यांचे २४व्या पुण्यस्मरणदिनी समाधीस आदरांजली वाहताना वारणा साखर कारखाना संचालक सुभाष जाधव, पंडित जाधव निवृत्ती शिंदे, हिंदुराव तेली, धोंडिराम सिद, प्रभाकर कुरणे आदी मान्यवर उपस्थित होते.