शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘केएमए’तर्फे विविध उपक्रम

By admin | Updated: July 2, 2015 01:03 IST

स्वच्छ भारत मोहिमेस पाठिंबा : ‘डॉक्टर-रुग्णातील सुसंवाद’ यंदाचे ब्रीदवाक्य

कोल्हापूर : ‘डॉक्टर्स डे’निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने स्वस्थ भारत अभियानांतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्यावर्षी ‘डॉक्टर-रुग्णातील सुसंवाद’ हे ब्रीदवाक्य असून त्यानुसार संस्था काम करणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. पी. एम. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौगुले म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियानाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. कारण स्वच्छता आणि आरोग्याचा घनिष्ठ संबंध आहेत. त्यासाठी स्वच्छतेचा प्रसार महत्त्वाचा आहे. म्हणून त्याअंतर्गत यावर्षी ‘आयएमए’ने डॉक्टर आणि रुग्णांतील संबंध या विषयावर जागृती करण्याचे नियोजन केले आहे. भारतात लोक डॉक्टरांना देव मानतात पण अनेकदा डॉक्टरांच्याही हातात रुग्णांना वाचवणे शक्य नसते. अशावेळी नातेवाईकांनी डॉक्टरांना समजून घेतले पाहिजे. आपल्याला काही आजार झाला असे समजले की रुग्ण डॉक्टरांकडे येतात पण नागरिकांनी आजारीच पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी. आजारपण टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात यावर ‘केएमए’ काम करणार आहे. चुकीची जीवनशैली, ताण-तणाव, अचानक उद्भवणारे आजार, पुढे होऊ शकणारे आजार आणि ते होऊ नयेत म्हणून आज घ्यावी लागणारी खबरदारी यावर ्असोसिएशन विविध व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करणार आहे. तसेच याविषयी प्रत्येक गावा-गावांत जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छ, जनजागृती याशिवाय रक्तदान शिबिर, बालआरोग्य केंद्र, वार्षिक कॉन्फरन्स, पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मार्गदर्शन असे विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले. परिषदेस सचिव डॉ. अशोक जाधव, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. रवींद्र शिंदे उपस्थित होते. ( प्रतिनिधी )शाम ए गझल ‘डॉक्टर्स डे’निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या आर्टस् सर्कलतर्फे रविवारी (दि.५) ‘शाम ए गझल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू स्मारक भवन येथे संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात डॉक्टर्स गीत-संगीत, नृत्य, शेरो-शायरी, कव्वालीचे सवाल जवाब, सुफी गीत असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.