शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ विविध स्पर्धा आज रंगणार

By admin | Updated: September 24, 2015 00:33 IST

आपले बाप्पा सोहळा : कलर्स आणि ‘लोकमत’ सखी मंच प्रस्तुत

कोल्हापूर : गणेशोत्सवानिमित्त ‘कलर्स व लोकमत ‘सखी मंच’ने ‘आपले बाप्पा’ या उत्सवात ‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा आज, गुरुवारी सायंकाळी चार वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे होणार आहेत. यानिमित्त विविध स्पर्धांमधून नैवेद्य, हार व पूजा याचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे. ‘आपले बाप्पा’ या सोहळ्याचे ‘कलर्स व लोकमत’च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे. सुखकर्ता श्री गणेश म्हणजे बुद्धीदेवता होय. म्हणूनच मोठ्या उत्साहात, दिमाखात या बुद्धी देवतेची आराधना करून तिची यथायोग्य पूजा केली जाते. गणेशाला नैवेद्य, आरती हार-फुले अर्पण करून प्रसन्न केले जाते.संस्कृती जपणाऱ्या ‘कलर्स चॅनेल’वर सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता प्रसारित होणारी ‘बालिका वधू’ ही पारिवारिक व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी व सर्वांत अधिक काळ चालणारी म्हणून जिला बहुमान मिळाला ती मालिका आता दोन हजाराव्या भागाकडे वळते आहे. आपल्या समाजातील बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष या मालिकेत दाखविला आहे. लहान मुलगी ते सशक्त आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी प्रगल्भ आनंदीचा जीवनप्रवास आणि इतर सामाजिक घडामोडींमुळे मालिका प्रत्येक भागात उत्कंठा वाढविणारी ठरली आहे. आनंदीची हरविलेली मुलगी आनंदीला भेटेल का? ती आनंदीला आपली आई मानेल का? या सर्व प्रश्नांचा उलगडा २००० व्या भागात होणार आहे. अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे (मो. ९६२३८९५८६६) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)‘कलर्स’तर्फे प्रत्येक सखीला आकर्षक भेट मोदक स्पर्धा, गणेश रेखाटन स्पर्धा आणि पुष्पहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदक स्पर्धेसाठी तिखट अथवा गोड मोदक घरून करून आणायचे आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी मांडणी करावयाची आहे, त्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. पुष्पहार स्पर्धेसाठी सर्व साहित्य घरून आणावयाचे आहे. स्पर्धेसाठी अर्ध्या तासांचा वेळ आहे. गणेश रेखाटन स्पर्धेसाठी रांगोळीसोबत पाने, फुले, हळद-कुंकू, अष्टगंध याचा वापर करून गणपतीची रांगोळी रेखाटायची आहे. रेखाटन करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सखींसाठी ‘कलर्स चॅनेल’कडून प्रत्येकीला आकर्षक भेट देण्यात येणार असून ‘सखी मंच ओळखपत्र’ आवश्यक असून वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सखींसाठी ‘वन मिनिट गेम शो’चे आयोजन करण्यात आले असून एका भाग्यवान सखीला पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच ‘कलर्स चॅनेलवरील’ ‘बालिका वधू’ मालिकेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.